घेऊन गेला सारी चिंता ,
उगवता तो सूर्य राजा ,
घेऊन आला आनंद वार्ता ...
मावळत्या सूर्याने वेचून नेले दुःख ,
उगवत्या सूर्याने ओंजळीत टाकले सुख ,
मावळत्या सूर्याने अपयश नेले सारे ,
उगवत्या सूर्याने खेचून आणले प्रगतीचे वारे ...
मावळत्या ने मिठीत घेतले सारे कुविचार ,
उगवत्या किरणांनी पाठवले सारे सुविचार ,
मावळत्याने अहंकाराला मावळायला सांगितले ,
उगवत्या ने माणसाला माणुसकी चे वरदान दिले ..
जसे सुख मावळते , तसे दुःखही मावळते ,
अपयशावर मात करून, पुन्हा यश उगवते ,
उगवणे - मावळने हीच खरी नियती ,
या नियतीवर अवलंबून माणसाची प्रगती ..
अतिशय सुंदर रचना 👌👌✍️✍️✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete