तरी , त्याचा तिच्याकडे नंबर नसणं तिला खूप खटकायच. तो आपल्याला एवढं महत्व देतो , मग नंबरच का नाही .
आपण एवढं परको आहोत ह्याला की नंबर द्यायला टाळाटाळ करतो . तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं.
तो तिला एवढं छान बोलायचा की हाच तिचं आयुष्य आहे . तिला ही त्याचं तिचं तस वागणं खूप आवडायच, त्याचं अधिकार गाजवण तिला एक नवीन प्रेरणा देऊन जायचं . त्याच नातं खूप छान आहे , अस काहीस तिला वाटायचं .
होतच त्यांचं नातं खूप छान , त्या नात्याला नाव गाव काहीही नव्हत , तरी ते जगातील सर्वात सुंदर नातं भासत होत .
पण हल्ली जरा त्याचं विचीत्र वागणं सुरू झालं होतं .
तो तिच्याशी concet तर होता . पण तिच्या पासून तो दूर दूर पळायचा अस काहीस तिला फिल व्हायचं . व्हायचं नाही तर , तसचं काहीस होतं
त्याला भीती वाटायची .तिच्याच अडकण्याची , तिच्यात गुंतन्याची ह्याउलट ती होती , तिला अजिबात भीती वाटत नव्हती त्याच्यात अडकण्याची त्याच्यात गुंतंन्याची. कारण तिला त्यांची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निभावायची होती . मनापासून तिने त्याला आपला मित्र मानल होतं . प्रेम होतं की नाही माहीत नाही , पण मैत्रीचं नातं एवढं घट्ट होत की कोणी जलाव आणि त्यांच्या नात्याला दृष्ट लागावी .
तो तिच्याशी concet होता , ती ही त्याच्याशी खूप concet होती . एकमेकांशी एक दिवस जरी बोलणं झालं नाही . तर त्यांना आपला दिवस पूर्ण झालाच नाही,
असं वाटायच . त्यांचं दररोज बोलण झाल नाही तरी दिवसातून एक तरी त्यांचा एकमेकांना मेसेज व्हायचा .
" Hi , how are you " आणि त्या मेसेज चे रिप्लाय यायचे हे ठरलेलं असायचं . त्यामुळे त्यांचं नातं कधीच disconcet झाल नाही .
पण हल्लीच त्याच तस् वागणं तिला असंख्य वेदना देऊन जायचं . तिला खूप त्रास व्हायचा , तो आपल्यापासून दूर दूर पळतो . ही वेदना तिच्यासाठी खूप मोठी होती .
कारण तिने त्याच्यावर कधीच बंधने लादली नव्हती . एक मैत्रीण म्हणून तिने त्याला त्याने तिला पूर्ण फ्रीडम दिलं होतं . त्यांच्या नात्यात खूप फ्रीडम होतं .
आपलेपणा होता ओढ होती ...
म्हणून तर तिचा त्याच्याकडे नंबर नसणं तिला न पटण्यासारखे होत . तिने आता हट्टच धरला होता . की त्याने आपल्याला आता तरी त्याचा नंबर द्यावा . आणि त्याला ही वाटायचं हिने आपल्याला तिचा फोटो पाठवावा . ती हट्टाला पेटली होती की त्याने आपल्याला नंबर द्यावा . आणि तो ही हट्टाला पेटला होता की हिने आपल्याला फोटो द्यावा .
तो तिचा सुपर फॅन झाला होता . त्याला वाटल ती आपल्याला सहज फोटो पाठवेन . पण आता ती काही त्याचा नंबर घेतल्याशिवाय शांत बसणार नव्हती .
त्याने तिला मेसेज केलेला होता .
" फोटो पाठव की प्रतिलीपी वर chat room मध्ये "
तिने त्याला असा रिप्लाय केला .
" राहुल मी का रे तुझ्या तालावर नाचाव "
" नाच की आपल्याच माणसाच्या तालावर नाचायचं असतं ना "
" हो का ? मग तू नाच की काय फरक पडतो . "
" मी फक्त बायकोच्या तालावर नाचणारे "
" नाच मग , पण मी नाही कोणाच्या तालावर नाचणार
नवऱ्याच्या सुधा .."
" जाऊ दे सोड मग "
" म्हणजे "
" काही नाही "
" ग्रह फिरतात की काय राहुल तुझे "
" हो ग्रह हे फिरण्यासाठीच असतात . एका जागी स्थिर राहिले तर , हवामान कसे बदलणार ."
" खरच तुझे ग्रह बदलतात . तू ना एक जगावेगळ
प्रकरण आहे . ते कोणीही वाचू नाही शकणार . जाऊ दे देते मी विषय सोडून "
" Hmm "
" म्हणजे मी काय समजावं नक्की "
" ते सोड तू मला फोटो पाठव आधी "
" तू मला wp दे . मी लगेच पाठवते ."
" देतो पण तू आधी पाठव ."
" ओके "
तो तिला नंबर देतो . आज ती खूप खूश होती . आज आपण काहीतरी मिळवलं त्यांच्या मनात आपल्या नाव रुजवलं . ह्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं .
तो ही खुश होता . त्याच्या ही मनात होत आता मैत्री पुढे जावी . म्हणून त्याने तिला प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्स दिला .
Wp वर आल्यानंतर त्याने तिला त्याचे सर्व फोटो पाठवले . हिने तिचे त्याला सर्व फोटो पाठवले . त्याला तिचा आवाज ऐकायचा होता . म्हणून त्याने एक vioce मेसेज केला . आणि आता तू पाठव अस ही सांगितल .
मला नाही येत अस सांगून ती मोकळी झाली . ओके तो चिडला जरा स्टिकर्स पाठवले . खूप हसले एकमेकांशी आणखी concet झाले ...
ती त्याला आवडायची तो ही तिला आवडायचा , स्टिकर्स मधून ते व्यक्त व्हायचे . अजुन बोलायला घाबरत होते . कुठेतरी थांबले होते. की एकमेकांसाठी वेळ मागत होते देव जाणे . "
पण अजूनही ते अव्यक्त होते ...काय माहित कधी होणार व्यक्त होतील की नाही ते ही माहीत नाही . पण हे नातं कधी पडद्याआड होणार नाही . हे मात्र नक्की ...
ते व्यक्त होणार की नाही ते बघुया पुढच्या भागात तो पर्यंत वाचत रहा ...
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ...
No comments:
Post a Comment
Comments plz.