नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 16, 2021

माझ्या ह्या सुरांना ...

हरवलेल्या माझ्या सुरांना , 
सुर जरा तू दे ,
मला तुझ्या मिठीत घे ..

अनोळखी ह्या वाटेवर रेंगाळले स्वर 
त्या स्वरांना सावर रे क्षण भर ..
हळुवार माझ्या मनाला घाल रे तू फुंकर ...

लाजुळूचे झाड मी तुझ्यात सामवण्यास लाजते ,
तुला बघताच भावनांचे फूल होऊन फुलते ..
तुझ्या स्पर्शाने अनोखेच तेज चेहऱ्यावर पसरते ..
कोमजूनही पुन्हा पुन्हा उमलते ....

नाते हे सप्त पदीचे निभवण्यास खंबीर होते ,
माझे अपूर्णत्व तुझ्यात सामावून घेते ..
माझ्या ह्या स्वरांना सुर तुझे जोडते ....

2 comments:

  1. खुप छान रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  2. वाहहह... अप्रतीम रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...