नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 14, 2021

प्रेम बंधन भाग 8

राहुल नित्या वर एवढा चिडला होता , की तो तिला समजून घेण्याच्या मन स्थितीतच नव्हता . तिने त्याला खूप समजावल होत . ती त्याला एकदा नाही , दोनदा नाही  , तीनदा नाही दररोज सकाळी उठल्या उठल्या सॉरी हा मेसेज टाकायची . रिप्लाय येणार नाही , माहीत असताना सुद्धा रिप्लाय ची वाट बघायची . 
मावळणरा सूर्य रोज मावळयचा ती त्यालाही हसत हसत बाय बाय  आणि नव्या उमेदीने उगवणाऱ्या सूर्याची वाट बघायची .

 त्यांचं नातं कोलमडून गेलं होतं , फुल फुलता फुलता पाकळ्यांनी साथ सोडली होती , जरी पाकळ्यांनी साथ सोडली होती , तरी फुलाने फुलण्याचीचं ईच्शा व्यक्त केली होती . नव्या उमेदीने पुन्हा एकदा सुंदर आयुष्याची सुंदर स्वप्न पहिली होती . 

दिवसामागून दिवस गेले , 1 महिना त्यांनी एकमेकांशी अबोला धरला . राहुललाही तिची खूप आठवण यायची.
तिला तर त्याच्या आठवणीने गहिवरून यायचे . उगाच आपण बोलण्याची limits kros  केल्या आणि एवढ्या सुंदर मैत्रीला कायमचं मुकलो . 
राहुल तिची परीक्षा घ्यायची होती की काय काही माहीत नाही पण , तो परत आला एक नवीन ओळख घेऊन प्रतिलीपीच्याच कट्ट्यावर आयुष्याची डायरी ह्या नवीन नावाने त्याने अकाऊंट ओपन केलं . ती त्याला कधीच विसरू शकणार नव्हती . त्याला ओळखन तिला कधीच जड नव्हत . तिने सहज ओळखलं राहुल ला . तो तिला काही केल्या ओळख द्यायला तयार नव्हता . तिला आता खूप त्रास होत होता . पण बोलावं तर कोणाजवळ शशी होता , पण त्याच्याजवळ तरी कसं कुठल्या अधिकाराने बोलणार म्हणून ती काही गोष्टी मनातल्या मनात चं दाबून ठेवते . 
प्रतिलीपी वर तिच्या खूप साऱ्या मैत्रिणी होत्या . त्यांच्यातल्या बऱ्याच जणींना तिने सांगितलं होतं . तुम्ही त्याची ओळख काढा . प्रत्येकीने काढण्याचा प्रयत्न केला  . 
तो प्रत्येकीला खोटं बोलला मी राहुल नाहीतर दुसराच कोणीतरी आहे . असं भासवत राहिला . तरी हीच मन तिला हेच सांगत होता . की दुसरा तिसरा कोणी नाही . हा राहुल च आहे . हा जर राहुल नसेल तर मग एवढं साम्य कसं काय ? थोडफार असू शकत एवढं साम्य  असू शकत नाही . 

ती त्याच्या पोस्ट वर कॉमेंट पण करायची . तो सर्वांना रिस्पॉन्स द्यायचा . हिला मात्र त्याचा काहीचं रिस्पॉन्स नव्हता . त्याची हर एक अदा हिला घायाळ करणारी होती . हर अदा हेच सुचवत होती हाच राहुल आहे . 
शहानिशा करण्यासाठी हिने त्याला hi असा मेसेज केला. दोन दिवस रिप्लाय ची वाट पाहिली . तरी काही ही रिप्लाय आलेला नसतो . नंतर ती ही त्याच्या नादी लागली नाही . तिने विषय सोडून दिला . 
दोन दिवस तिने त्याला इग्नोर केलं . ही आपल्याला परत कसा रिस्पॉन्स देईल ह्या आयडिया ने त्याने असा dipi ठेवला की नित्या परत comfuse झाली . 
आता नित्याने डायरेक्ट त्याला मेसेज केला . 
" Hi तू राहुल आहेस का ? राहुल असशील तर मग असं का वागतोस . "
ह्या मेसेजलाही त्याचा तिला काहीचं रिप्लाय नसतो .
ती खूप गोंधळून गेली होती . हताश होऊन तिने त्याचा नाद सोडून दिला होता . ही आपल्याला काहीचं रिस्पॉन्स देत नाही . हे बघून राहुल ने पुढाकार घेतला . तो तिचा superfan झाला . ही परत त्याला सॉरी बोलली . त्यानेही हिला माफ केलं . त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली .
आता त्यांचं नातं नवीन वळणावर येऊन थांबल होतं , आता नात्यात अजूनच ओलावा निर्माण झाला होता .
राहुल सहज बोलून गेला , मी तुला खूप मिस केलं . तुझ्याशी बोलत नव्हतो ; पण तुझ साहित्य डेली वाचत होतो . ती ही त्याला बोलली मी ही तुला खूप म्हणजे खूप मिस केलं .
 "का असं वागलास ? का एवढं छळलं ? आनंद वाटतो का मला छळण्यात " 😢😢
" हो खूप मजा येते तुझ्यासोबत भांडण्यात ."😂😂😂
" तुझ्याशी भांडल की नवीन एनर्जी मिळते ."😂😂
" हो का मग रोज भांडत जा माझ्याशी पण ; असा अबोला धरून कधीही छळू नको . अटॅक येईल रे मला हरवून जाईल मी ह्या आयुष्याला . "
" इट्स ओके खूप झालं आपली मैत्री आता कधीही तुटणार नाही . अजुन बहरणार हे माझं वचन .आवडेल ना आपली मैत्री पुढे गेली तर , की नाही ."
" थँक्यू सो मच हो नक्की आवडेल आपली मैत्री पुढे गेली तर once again thankyou so much , i miss you "
" Miss you to बोलू परत आता थोड काम आहे ."
" Ok tc "

नित्या आज खूपच खूष होती.  तिने आज खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला होता . आनंद तिचा गगनात मावेनासा झाला होता . पण एक प्रश्न तिच्या मनात सतत रेंगाळत होता . मैत्रीत पुढे जायचं म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं ह्याला , ह्या प्रश्नाने तिला जर त्याच्याकडे ओढल होतं .

तुम्हीही रेंगाळला ना ह्या प्रश्नांपाशी मी पण सोडूया ह्या प्रश्नाचं उत्तर पुढील भागात तो पर्यंत वाचत रहा . एन्जॉय करा .
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा .

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...