नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 15, 2021

ती एक रचना ...

किती तरी दिवसांनी ते काव्य वाचले ,
भाव अनोखे पुन्हा डोळ्यासमोर सजले ,

जुने क्षण नव्याने जागी झाले ,
त्याच्या माझ्या प्रेमाचे साक्षीदार झाले ...

त्या रचनेने तो माझ्यावर इंप्रेस झाला ,
मैत्रीने मैत्री पुढचा पल्ला गाठला ...

तू तर सुंदर आहेसच ,
पण तुझ्या हूनही सुंदर तुझे विचार ,
असं म्हणत म्हणत ,
रेखाटला सुंदर संसार त्याच्या माझ्या प्रेमाचा ...

ती एक रचना मला त्याच्याशी कनेक्ट करून गेली ,
ही फक्त तुझीच आहे , त्याच्या मनात बीज हे रुजवून गेली ....

नकळत मैत्री पुढचा प्रवास सुरू झाला ,
आम्हाला मात्र अंधारातच ठेवून गेला ....


3 comments:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खुप सुंदर 👌👌

    ReplyDelete
  3. खूपच छान....👌👍✍️🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...