नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 21, 2021

प्रेम बंधन 11

राहुल आणि नित्या लग्न झाल्यानंतरही त्यांची मैत्री जपू लागले . राहुल तिला रिदिमाचे एक एक नखरे सांगून हसवू लागला . तो रिदिमा बरोबर जराही खुश नव्हता हे तिला सहज कळलं होतं . पण तिने त्याला , " तू रीदिमा बरोबर खुश नाहीस ना " असं कधीही विचारलं नव्हत . कारण तिने जर तस त्याला विचारलं असतं तर , तो खूप hurt होईल ह्याची तिला खात्री होती . म्हणून ती कळूनही न कळल्या सारखी वागायची . 

त्याचं लग्न झालं होतं , पण तरीही तो अजुनही नित्या मध्ये गुंतलेला होता . अजुनही तो तिच्यासाठी रचना करायचा . तीच्यासाठी केलेली प्रत्येक रचना तिला आवडायची . त्या प्रत्येक रचनेला ती कॉमेंट करायची ..
त्याने तिच्यासाठी केलेली एक रचना अशी होती ...

भगवान ने भी क्या किया ,
जीसको मैने दिलं था दिया ..
उसी से ही अलविदा किया ..
मै भी अभी तक उसको भुल न पाया ..
क्या अजनबी है इस दिल की दास्तान ...

ही रचना वाचून नित्या एकदम भाऊक झाली . नकळत तिच्या डोळ्यातून ही अश्रू ओघळले ...
तिने त्याला कॉमेंट केली....
 
अलविदा नही ,
एक नये मोड पर ,
फिर उससे ही मिलाया है ..
जीसको आपने दिलं है दिया ...
उस रिश्ते की कोई पहचान न होगी 
लेकिन एक जरूर ,
उस प्यार की उमर बढ़ती ही रहेगी ।
जितना प्यार अब है ।
इस पल ,
उतना ही प्यार आखरी सांस तक रहेगा ।
इसी जन्म में नहीं ।
अगले सातो जन्मों तक रहेगा ।।
है वादा है मेरा आपसे ।
दिया हुआ दिल से  ....😊😊😊🥰🥰🥰🥰
राहुल कॉमेंट वाचून 👍👍👍असा रिप्लाय करतो ...
आणि लगेच तिला कॉल करतो ..

" हाय ! कशी आहेस ? "
" मी मस्त ..तू ? "
" मी पण एकदम झकास ."
" Hmm फ्री आहेस वाटत म्हणून कॉल केला . हो ना ."
" नाही "
" मग "
" बायको गेली ना माहेरी म्हणून " आणि मोठं मोठ्याने तो हसायला लागला ...
ती त्याच्यावर जराशी चिडली अलगद अशी हसत " राहुल तू पण ना "
" काय ग काय मी पण "
" काही नाही "
" सांग ना काय मी पण "
" खूप छुपा रुस्तम आहेस ..एक नंबरचा खडूस आहे . सारखा छळत असतो मला .."
तिच्या अश्या बोलण्यावर तो पुन्हा हसायला लागला . आणि तिला चिडवत बोलला , " हे बघ मी काही तुला छळत नाही ...तुला छलन हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे . तो काही विसरत नाही .." आणि परत हसायला लागला ..
ती जराशी रुसत आणि वाईट वाटल्याचा आव आणत ,
" जा नको बोलुस तू माझ्याशी ठेवते मी फोन .."
आणि ती लगेच फोन कट करते ...
तो परत तिला कॉल करतो ..
" अशी काय ग तू ? "
ती जरा हटके आणि मटक्या मारत .." कशी रे मी ? सांग बर जरा ."
" हे काय माझी बायको माहेरी गेली ना , जरा तिच्या जाण्याचा आनंद घेऊ दे ना मला .." 
" मग जा की हॉटेल मध्ये जेवायला . By yy"
असं म्हणत ती परत फोन कट करते ..तो परत तिला कॉल करतो ..
" काय चालू आहे तुझ ..का एवढा भाव खातेस ? "
" तू का मला एवढं छळतोस ? "
" स्वारी यार आय एम स्वारी .."
" Good mr . R. पाटील .."
" Love you "
" Love you to ..काय रे आज तू फ्री कस काय ? "
" आज काम थोडी होती . मग ऑफिस ला नाही गेलो .तुझी आठवण आली मग कॉल केला . नाही आवडल का ? "
" अशी बोलली का मी , तू पण ना मनाचे तर्क लावतो ."
" ती सवय आहे . तू अजुन मला पूर्ण जाणले नाही . त्या जाणून घे बालिके .."
" हो बालका ..नक्की प्रयत्न करते . आपले आशीर्वाद असू द्यावेत म्हणजे जाणून घ्यायला सोपं जाईल ."
" तथास्तु !!!"
" वेडा पेडा ...पुरे झाला हा तमाशा .."
तो हसत ती ही एक क्षण हसण्यात ते हरवून गेले ..
थोड्या वेळाने तो तिला विचारायला लागला . "तुझ्याकडे काही good news आहे की नाही ? "
" आहे ना उद्या बघायला मुलगा येणार ..बाबा मुलगा चांगला आहे . असं बोलले ... आय.पी.एस आहे .. त्या ला जर मी पसंद पडले . तर यंदा कर्तव्य आहे . "
" व्वा मस्तच ! मग तू माझा पिष्चा सोडणार तर , "
" म्हणजे तुला म्हणायचं काय ? "
" अगं तुझ लग्न झाल्यावर आपली मैत्री संपेन ना ."
" असं का वाटलं तुला . तुझ लग्न झाल्यावर संपली का आपली मैत्री ? नाही ना ! मग माझ लग्न झाल्यावर ही नाही संपणार . डोन्ट वरी .."
" नक्की ना " आता जरा तो भाऊक झाला होता ." 
" 💯टक्के नक्की .  अरे वेड्या तो आय .पी .एस आहे ना सारखं सारखं थोडी माझ्याजवळ असणार .." आणि ती हसायला लागली . 
" अग खर ग . देवाने हे एक बरं केलं बघ . रिदिमा actress आणि हा i.p.s.दोघेही bussy ."
" हो "
" मग उद्या तुझ लग्न नक्की ठरायला हवं ."
" ते तर नक्की होणारच राहुल .  त्याने पाहिलंय मला याआधी ...पण तू येशील ना माझ्या लग्नाला .."
" हो नक्की येईन . "
" मी वाट बघेन .. तू माझ्या लग्नाला यावं . माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोड क्षणाला तू तिथे असायला हवा. असं मला मनापासून वाटतं ."
" येईल की . तू फक्त लग्न चोरुन नको करू . कळव . मला हळदी पासून येइन् ."
" हो नक्की ..लव्ह यू बाय बाबा आले . बोलू नंतर ."
" हो काळजी घे .आणि आठवणीने कळव ..मी वाट बघतोय ..लव्ह यू टू .."
" Hmm " 
ती लगेच फोन कट करून खूप रडते ...आपल्यावर आता दोन दोन विश्वासू नात्याची जबाबदारी असणार . ती जबाबदारी आपण पेलवू शकू ना . ज्याने आपल्यावर जिवापाड प्रेम केलं . आपल्यापासून कधीही वेगळं  न होण्याचं  स्वप्न पाहिलं . त्याचं आपण ते स्वप्न पूर्ण करू शकू ना ..."

काय वाटतं तुम्हाला नित्याच्या लग्नाने त्यांचं प्रेम बंधन तुटेल का ? 
मलाही खूप प्रश्न पडलेत ती प्रश्नाची उत्तर मात्र मी नक्की शोधणार तो पर्यंत तुम्ही वाचत रहा . प्रेम बंधन ..

मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ..

🙏🙏🙏🙏🙏


1 comment:

  1. खूप छान स्टोरी...👍👌✍️🌸

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...