नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 23, 2021

स्वप्न प्रितीचे आज समर्पित केले ...

त्या अथांग सागरात सोडून आले मी एक मन ,
ज्यात साठवले होते काही गोड क्षण ,

स्वप्न प्रितीचे स्मशानात समर्पित केले ,
झगझगणाऱ्या ज्वालांना अश्रू हे  दान केले ..

अथांग सागराशी मी एकरूप झाले ,
त्यात स्वप्न प्रितीचे हे वाहून गेले ...

सागरात सूर्याचे  प्रतिबिंब साचले ,
त्यातच एक नवं उमेदीचे किरण दिसले ..

हळूच येऊन ते कानात कुचबूजले ...
स्वप्न प्रितीचे हे मी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला समर्पित केले ..

स्वप्न प्रितीचे हे मी आज स्वखुशीने समर्पित केले ,
आयुष्याला माझ्या एक नवीन वळण दिले ...

2 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...