नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 23, 2021

प्रेम बंधन भाग 12

काल नित्या आणि राहुलच् बोलण झाल , आणि आज ठरल्याप्रमाणे नीत्या ला बघायला पाऊने आले ..
थ्री फोर स्लिवज च ब्लाऊज ,  ग्रे कलरची साडी ,
ओठांवर नाजूक अशी रेड कलरची लिपस्टिक ,
केस मोकळे सोडलेले , एका हातात बांगड्या आणि एका हातात वॉच ...कपाळावर नाजूक स्टोन ची टिकली .
One side पदर ह्यात ती एवढी सुंदर दिसत होती . की कोणीही तिला पहिल्या नजरेत पसंद करेन . नाही म्हणायची कोणी हिंमत करणार नाही ..
तिला बघायला आलेला मुलगाही खूप हँडसम व्हाइट कलरच शर्ट , highted , p.s.i.म्हंटल्यावर काही पहायच काम होत का ? खूपच दशींग अशी त्याची वर्दी . त्याला बघूनही कोणतीच मुलगी लग्नासाठी नकार देणार नाही ....
त्याची तिची नजरेला नजर पडली ,
चेहऱ्यावर कळी उमलली ,
स्मित हास्य गाली उमटली ,
बाकीच्या पावण्यांनी दोघांची नजर न्याहळली ,
आजच सुपारी फोडूया अशी जबानी दिली ..
नवरी ती लाजत च किचन मध्ये पळून आली ..

दोघे एकमेकांना पसंद होतेच . पण त्यांना प्रत्यक्ष विचारून  " तुम्ही लग्नासाठी तयार  आहात का ? तशी खात्री करून घ्यायची होती ..तिने मानेनेच होकार दिला.
त्यानेही तिच्या हो , त . हो मिळवला . आणि मग लगेच ज्या दिवशी तिला बघायला पावणे आले त्याचं दिवशी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ही झाला ..आणि लग्न फिक्स ठरल्याचं जाहीर ही झालं .. गावभर साखर वाटून तिच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला ...

तिलाही तो बघता क्षणी आवडला होता ,  म्हणून ती ही खूप खुश होती . 
ते जाईस्तोर त्यांची नजर एकमेकांना खेटलेली होती . 
स्पंद नात एक वेगळीच ऊर्जा खेळत होती ...सगळचं काही खूप छान होतं , हवं हवंस वाटणार होत . स्वप्नापेक्षा ही सुंदर त्याचं आज अस्तित्व होत . खरच आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता . तिला आज एका क्षणासाठी का होईना , सर्वाचा विसर पडला होता . अगदी राहुल चा सुधा ती फक्त समोर उभ्या असणाऱ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याचाच विचार करत होती . त्याच्याच विचारात ती बेधुंद झाली होती . हरवून गेली होती स्वतःच्याच विश्वात त्याच्या ओझरत्या श्वासात ...आजचा दिवस हा कलुच नये . सुर्य अस्ताला जाऊच नये . असं तिला सतत वाटायचं . तिचं मन त्याच्याकडे धाव घ्यायचं . 
ते गेल्यानंतर ही ती तासभर त्याच्या प्रतिमेला डोळ्यांसमोर साठवून त्याला पुन्हा पुन्हा आठवत होती .
आज तिच्यासाठी तोच तिचा सर्व स्व झाला होता ...

थोड्याच वेळात ती भानावर आली . तिने मोबाईल हातात घेतला . डाटा ऑन केला . तिला पाहिलं Notification आलं ते राहुलच्या मेसेजच . 
" काय ? झालं का बघण्याचा कार्यक्रम "
' काय झालं? आहे का यंदा कर्तव्य ! "

तिने त्याला आजचा घडले ला प्रकार सांगितला . त्याच्या मेसेज ला तिने रिप्लाय दिला . "
हो आहे लवकरच आज सुपारी फुटली ...काहीचं दिवसात एंगेजमेंट आणि मग लग्न ..करा मग तयारी आम्हाला भेटायला यायची ....
तो कधाचीत ऑफलाईन होता . त्यामुळेच तिच्या मेसेजला बराच वेळ होऊनही काही रिप्लाय आला नव्हता . वाट वाट बघून बघून शेवटी ती ऑफलाईन गेली  .
ऑफलाईन गेल्यानंतर तिला लगेच एक कॉल येतो . Unknowm नंबर असल्यामुळे तिने कॉल रिसिव्ह न करता कट केला . परत थोड्या वेळाने त्याचं नंबर वरुन तिला कॉल आला . तिने परत कट केला . त्याने परत कॉल केला मग हिने शेवटी रिसिव्ह केला . आणि तोंडाचा पट्टा न सांभाळता डायरेक्ट भांडली त्याच्याशी .
" काय आहे ? सारखा कॉल करताय काही काम नाहीत का तुम्हाला ? समोरचा व्यक्ती कॉल रिसिव्ह करत नाही.
ह्याचा अर्थ त्याला तुमच्याशी बोलायचं नाही . किंवा तो bussy असेल एवढी साधी गोष्टही लक्षात येत नाही का?
Exuse me!
समोरून फक्त एवढाच रिप्लाय आला ...तो रिप्लाय ऐकुन तापलेली नित्या जराशी थंड झाली . आणि कोमल आवाजात त्यांना विचारू लागली ..
" कोण आपण ? नाव काय आपलं ?
" माझं नाव शेखर "
" नावं कुठेतरी ऐकाल्या सारखं वाटतं ."
" Hmm आजच ऐकल की , एवढ्यात विसरलात ? "
ती जरा गोंधळली होती , आणि थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं . शेखर म्हणजे आपला होणारा नवरा . तिला आता तिचीच लाज वाटत होती ...तिचे बोलण्याचे सुरच बदलले ..
" स्वारी , स्वारी आय एम रिअली सॉरी ..."
तो हसतच इट्स ओके चालत अस कधी कधी.....
तुम्हाला शोभणार होतं ते वागणं . एका i.p.s च्या होणाऱ्या पत्नी आहात ना आपण एका . I.p.s ऑफिसरच्या पत्नी शोभता आपण ..."
 
ती जराशी कावरी बावरी होऊन लाजली , आणि हसली .
" थँक्यू आणि खरच स्वारी ..ओळखीचे नंबर फक्त मी रिसिव्ह करते . अनोळखी नाही ."

" हो ठीक आहे . पण अनोळखी ही करायला हवे . कधी कधी ते ही महत्वाचे असू शकतात .."

" Hmm यानंतर लक्षात ठेवेन.  थँक्यू बायदवे तुम्हाला माझा नंबर कोणी दिला ? "

" दिला नाही मीच घेतला . तुमचा मोबाईल बेड वर पडलेला होता . मी त्याच्यावरून माझ्या नंबरवर एक misscall केला होता .."

" Ohh ! nice ! तुम्हीही एक dashing . I.p.s शोभता  . "

" I.p.s ची वर्दी आम्हाला dashing वागायला भाग पाडते . "

" Hmm , i can understand "

" Hmm good , very good !"

" तुम्ही मला अरे तुरे करा ना ."

" अहो असं कसं एकेरी नावाने हाक मारणार "

" त्यात काय एवढं होणारे पती आहात तुम्ही माझे "

" Hmm correct आहे . मग तू ही अरे तुरे च कर की "

" अहो अशी कशी करणार ...अरे तुरे वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात . शिवाय होणारे पतीही आहात . "

" मग काय फरक पडतो . चालत सार जग किती पुढे चाललय आपण इथेच अडकून रहायचं का ?"

" ओके चालेल मी अरे तुरे करेन पण आपण दोघेच असताना . बाकीच्यासमोर अहो जाहो च करेन . चालेल ना ."

" Hnm चालेल . बरं मी ठेवतो मला एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे . बोलू नंतर बाय आता तरी नंबर save करून ठेव . "
.
" Hmm नक्की ठेवते . बाय टेक केअर .."
असं म्हणत ती हसतच फोन ठेवून देते ....आणि पुन्हा प्रतीलिपिवर् जाते ...

राहुलचा तिला रिप्लाय येऊन खूप वेळ झालेला असतो . आताही तो ऑफलाईन गेलेला असतो . Wp वर पण त्याने काही स्टिकर्स पाठवलेले असतात ..ती त्याला thanks म्हणून रिप्लाय करते.  बोलण तर त्यांचं होतच नाही .

ती अशीच एक पोस्ट करते ...

आजच्या ह्या क्षणाला ,
उदान आले होते मनाला ,
बावरलेल्या माझ्या सख्याला ,
सांगायचे होते खूप काही ..
पण न बोलताच तो ऑफलाईन गेला बाई ...

आणि लगेच ती ही ऑफलाईन जाते ...थोड्या राहुल ती पोस्ट वाचतो आणि तिला रिप्लाय देतो ..

आता तो ऑफलाईनच असणार ,
कारण तुच bussy असणार ...
आणि तो ही ऑफलाईन जातो ...दोन तीन दिवस होतात.  त्यांचं बोलणं होतच नाही ... काय माहित पुढे जाऊन होईल की नाही . दोघानाही आता भीती आहे . संपते की काय आता आपले प्रेम बंधन ...

मला ही भीती वाटते हे प्रेम बंधन संपते की काय ?
बघुया पुढच्या भागात ...
मागील पृष्ठ वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा .....

🙏🙏🙏🙏🙏





1 comment:

  1. उत्सुकता छान वाढवली आहेस 👌🏼👌🏼

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...