खरं दुःख काय असतं ते आज खऱ्या अर्थाने कळलं .
आज आता पर्यंत हॉस्पिटल मध्ये होते . आजचा अनुभव
आणि दिवस नकळत खूप काही शिकवून गेला ...
किती रुग्ण होते जिवंत पणीच मरण यातना सहन करनारे . दररोज मरणाशी झुंज देत होते . आपल्या आयुष्यातील एक एक दिवस कमी होत चालले आहे . हे उगड्या डोळ्यांनी बघत होते . तरीही श्वास घेतच होते , भेटायला आलेल्या माणसांना एक स्माईल देत जगतच होते . ते सारे क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याजोगे होते .
मी प्रत्येक वार्ड न्याहाळत होते . सगळीकडे दुःख दिसत होते , आपला माणूस नंक्की बरा होऊन परत आपल्या घरी परत येईल , ही आस धरून वर्षा नु वर्ष तिथे बसले ली माणस मी पाहिली . माझी अश्रू फुल नकळतपणे त्यांना वाहिली .
जसे दुःखी चेहरे दिसले तसेच सुखाने ओतप्रोत भरलेले मनही दिसले . ते डिलिवरी वार्ड मध्ये . कोमल स्पर्श एका आईचा तिच्या इवल्याशा बाळाला होणारा एक अनोखा आनंद देऊन गेला . आसवलेल्या डोळ्यांना माझ्या समाधान देऊन गेला . पण कुठेतरी तिथेही दुःख हे अस्तित्वात होतेच . एक आई हे जग कायमचं सोडून गेली होती , तिच्या इवल्याशा लेकराला ह्या एकटं सोडून कायमची त्याच्यापासून दूर गेली होती . त्या क्षणी तर मला खूप गहिवरून आलं . ते बाळ आईच्या पान्ह्यासाठी रड रडत होत . बिचाऱ्याला माहीतच नव्हतं आता आपण पोरको झालो .
दुसरीकडे एक तरुण पंचवीस तीसितील असेल . तो त्याच्या अर्धागिनीला कायमचं सोडून गेला होता . त्याची गोंडस मुल आज कायमची पोरकी झाली होती . अर्धागिनी तर अर्धी झाली होती . तिथे मला खर दुःख काय असतं . ते उमगल ....!!!
खर दुःख बघायच असेल ना तर , एकदा तरी हॉस्पिटल मध्ये जावं . स्पेशली तेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं असेल , आपण खूप दुखी आहोत . मग कळेल आपल्याला आपलं जे दुःख आहे ना , ते काहीचं नाही हे .
यापेक्षाही खूप मोठे दुःख उरात घेऊन माणस आयुष्याची वेल वाढावी ह्या आशेने जगत आहे .
एखाद्या प्रियकराने एखाद्या प्रेयसीला सोडून दिलं , हे दुःख काहीचं नाही . तिथे काय संघर्ष आहे . काहीच नाही साधी समजून घेण्याची ही ते रिस्पॉन्सबिलिटी घेत नाही .
म्हणून त्यांच्या वाट्याला दुःख येत . स्वतःहून दुःख ते अंगावर ओढून घेतात .
खरं दुःख काय असतं ते एका हॉस्पिटल मध्ये गेल्यावर किंवा अनाथ आश्रमात गेल्यानंतर च कळत...
नित्या....!
ReplyDeleteदुर्गा....! खरंच दुर्गामातेचे दर्शन तू या लेखातून अवतरले आहे.खूप छान सुंदर शब्दांत सांगितलं.आणि सत्य परिस्थिती आहे..!👌
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आबा 🙏🍧
खूप सुंदर लिखाण केले आहे...👍👌✍️🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर लिखाण केले आहे ,खऱ्या दुःखाची जाणीव व्यक्त केली आहे.👌👌👌
ReplyDelete