नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 26, 2021

अक्षदा ....

हा जन्म आहे मानवाचा ,
जसा सावळ्या मेघांचा ...
ध्रुव तारे नक्षत्रांचा ,
ओल्याचिंब पापण्यांचा ....

सहवास उमलता हास्याचा ,
अगंणी फुले पिसारा प्राजक्ताचा ...
तुझ्या माझ्या प्रेमाचा ...
डाव हा क्षणोक्षणीचा ...

मेघ ओले ते गरजु लागले ,
पापण्यांना माझ्या श्वास तुझे गोंदु लागले ,
प्रीत वेडी हि पाहून अंबर हसू लागले ...
अक्षदा पडता डोईवर ,
माझ्यातील लाजाळूचे झाड लाजू लागले ....

3 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द

    ReplyDelete
  2. वाह... खुपच सुंदर ✍️✍️

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...