केवळ एक आदर्श स्त्री होण्याचं आहे .
सर्वात आधी एक चांगली व्यक्ती होण्याचं आहे .
मग एक चांगली मैत्रीण , एक चांगली मुलगी , एक चांगली बहिण , एक चांगली बायको , एक चांगली आई , एक चांगली सून आणि मग ह्या सगळ्यांच्या समिकरणातून एक आदर्श स्त्री ......
एवढंच माझ स्वप्न ....
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल , एवढी चांगली मुलगी एकविसाव्या शतकात एवढं सामान्य स्वप्न बघते .
हो बघते मी एवढं सिंपल स्वप्न ...मला अभ्यासात कमी आहे असं काही नाही . माझ्या वर्गातील टॉपच्या मुलींबरोबर मी सहज गणल्या जायची . परिस्थिती नाही शिकण्याची असही काही नाही . आणि शिक्षण इथेच थांबवायचं आहे . हे ही नक्की नाही . शिकायचं पण आहे . पण ते फक्त डिग्री मिळवण्यासाठी नोकरी करण्यासाठी नाही .
माझी बिलकुल ईच्शा नाही बाहेर जाऊन नोकरी करण्याची . डेरिंग नाही असं ही काही डेरिंग पण आहे . सर्व काही असताना ही स्वप्न माझं एक चांगली हाऊस वाइफ होण्याचंच आहे .
मी हाऊस वाइफ होण्याच स्वप्न बघायचं म्हणून नाही बघितलं . त्यामागेही कारण आहेत काही ..मी जर उद्या कामासाठी बाहेर पडले तर मग माझ्या कुटुंबाचं काय ? हा विचार मनात येतो . आणि मग नकोस वाटतं बाहेर जाऊन काम कारण . कारण एवढं सोपं नक्कीच नाही . घर सांभाळून नोकरी करण .
पैसा येतो म्हणून आपण तडजोड करण एकवेळेस स्विकारतो ही , पण खरच काहीही गरज नाही , ही तडजोड करण्याची . काय फरक पडतो एक स्त्री केवळ एक हाऊस वाइफ असली तरी , मला विचारलं तर काहीही फरक पडत नाही . आणि एक हाऊस वाइफ असण्यात काही कमीपणा ही नाही . उलट एक चांगली हाऊस वाइफ होऊन एका आदर्श स्त्रीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडन हेच महत्वाचं आहे . आणि हेच माझं माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर स्वप्न आहे .
मला नाही intrest बाहेर जाऊन 10 - 15 हजार रुपयांसाठी नोकरी करण्यात याचा अर्थ मला नवऱ्याच्या जीवावर आइश करायची असाही होत नाही . Infact मला दुसऱ्या समोर पैशाची भीक ही मागायला आवडत नाही . गेल्या दोन वर्षांपासून मी किती वेळेस वडिलांकडे पैसे मागितले असतील हे मला आठवतही नाही . मी स्वतःच्या जीवावर आइश करणारी मुलगी आहे . कोणावर अवलंबून रहायला ना कधी मला आवडलं ना कधी आवडेल ....
घरी राहूनचं एखादा छानसा छोटासा पैसे कमवण्यासाठी उद्योग ही करणार आणि एक आदर्श हाऊस वाइफ ही होणार .....
भले मी बाहेर जाऊन पन्नास हजार रुपये कमवत असेल , पण ; मी घरच्यासांठीचं वेळ देऊ शकत नसेल तर काय कामाचे ते पन्नास हजार रुपये . मी माझ्या मुलांसाठी कमी पडत असेल , माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कमी पडत असेल तर काय कामाचं मला मिळणार स्वत्रंत आयुष्य ...
नंदा घरी आल्या आणि मी ऑफिस मध्ये का जीव अडकेन त्या बीचाऱ्यांचा तरी माझ्यामध्ये .. मला प्रत्येकाला लळा लावायचा आहे . माझ्या माणसांना जिंकून घ्यायचं आहे . त्यासाठी माझं स्वप्न एक चांगली हाऊस वाइफ होणेच आहे . कारण डिग्र्या रस्त्यावर पडलेल्या आहेत . नोकऱ्या नाही . हे पण लक्षात ठेवायला प्रत्येक स्त्रीने ....मला लग्नानंतर निदान 20 ते 25 वर्ष कुटुंबासाठी द्यायची आणि मग नंतरची माझ्या स्वतःसाठी . तुम्ही आता म्हणाल मी खूप मागासलेल्या विचारांची आहे . तर आहे बाई मी मागासलेल्या विचारांची . मला प्रोब्लेम नाही ...
मी माझं स्वप्न सांगितल तुम्ही बघा स्वप्न वेगळी नोकरी करण्याची मला प्रोब्लेम नाही ...
छान स्वप्न आहे तुझे असं साधं राहणं आणि उच्च विचार ठेवणे फार कमी जणांना जमते
ReplyDelete