नको उगाच वाद वाढवुस ....
समजून घे जरा ,
घर आहे भांड्याला भांडं लागणारच ,
भांडणे ही होणारच ...
नको एवढं मनाला लावून घेऊस ,
असा तावातावाने चुकीचा निर्णय घेऊन पस्तावशील ..
मग उगाच एकटी पडशील ,
तुझ्या आनंदाला तू मुकशील ,
मग रड रड रडशील ....
घर बांधून ठेवण्यातच खर स्त्रीत्व आहे ,
घराला घरपण आलेल्या घरातच तिचं अस्तित्व आहे ..
ते अस्तित्व जप , ह्या घराला बांधून ठेव ...
एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहण्यातचं खरी मजा आहे हे जरा मान्य कर ....!!!
इथे यमक जुळल नाही ...कविता मुक्तछंद ह्या श्रेणीत आल्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही ...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteखूप खूप छान 👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteछानच लिहिलंय 👌👌👌
ReplyDelete