मी लिहिते श्वास घेण्यासाठी ,
मी लिहिते समाजासाठी ,
मी लिहिते स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी ..
मी लिहिते भूतकाळ विसरण्यासाठी ,
मी लिहिते उज्वल भवितव्यासाठी ,
मी लिहिते दिवसाची गोड आठवण रचनेत साठवून ठेवण्यासाठी ..
मी लिहिते एक क्षण अनेकदा आठवण्यासाठी ..
मी लिहिते माझ्या आनंदासाठी ,
मी लिहिते माझ्या समाधानासाठी ..
मी लिहिते माझा छंद जोपासण्यासाठी ...
मी लिहिते माझ्याच विश्वात हरवून जाण्यासाठी ,
मी लिहिते स्वप्न पूर्तीसाठी ,
मी लिहिते ध्येयपूर्तीसाठी ..
मी लिहिते एक उत्तम लेखिका बनण्यासाठी ,
हजारो वाचकांच्या मनात घर करून राहण्यासाठी ,
युगान युगे माझ लिखाण अजरामर होण्यासाठी ,
स्वरगगवासी होऊनही रचनेच्या स्वरूपात जिवंत राहण्यासाठी ....
मी लिहिते एक मोकळा श्वास घेण्यासाठी .....
अतिशय सुंदर लिखाण 👌👌👌
ReplyDeleteवाह...खुपच अतिशय अप्रतिम लिहिले आहेस 👌👌👌
ReplyDeleteमी लिहते माझा आनंद जपण्यासाठी...!!
ReplyDeleteवाहह..खुप सुंदर लिहीलस नित्या...👌👍💐🍫
व्वा..अतिशय सुंदर लिहिलंय 👌👌👌
ReplyDelete