नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 28, 2021

आयुष्याने ह्या खूप काही शिकवलं ...

 ह्या आयुष्याने खूप काही दिलय ,
खूप काही हिरावून घेतलय ..

आयुष्याने फुलासारखं फुलायला शिकवलं ,
कोलमडलेल्या मनाला माझ्या उमलण्याच बळ दिलं ..

आयुष्याने सूर्याची कठोरता माझ्यात सामावली ,
चंद्राची शीतलता सामावण्यासाठी माझी निवड केली ..

आयुष्याने आपलेपणा जपायचा शिकवला ,
क्षणात परकेपणा देनाऱ्यालाही आपलचं मानण्याच वरदान दिल ..

ह्या आयुष्याने नदीच्या पात्रासारखं पवित्र राहण्यास शिकवलं ,
तुझ्या पात्रातील अपवित्रता ही तुझ्यात सामावून घे ,
हक्काने सांगितल ...

आयुष्याने ह्या खूप काही शिकवलं ,
तुटलेलं मन , तडा गेलेले हृदय पुन्हा कसायला शिकवलं ..

3 comments:

  1. वाहहह...कवीता वाचुन खुप काही गवसल...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना सुंदरच 👌👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...