कितीतरी दिवसापासून त्याच्या मनात होतं . पण अस डायरेक्ट म्हणणार तरी कसं म्हणून त्याने टाळलं होतं .
पण आता मनासारखं सार घडलं होतं . म्हणून दोघेही खूप खुश होते ...!!!
राहुलने ज्यादिवशी नंबर दिला , त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेशली तिच्याशी बोलण्यासाठी त्याने वेळ काढला होता . तिलाही फार आनंद झाला होता . पण त्याच असं विचीत्र वागणं जरा तिला खटकायच . ती त्याला डायरेक्ट तस् बोलूनही दाखवायची . तो त्याच्यावर फक्त तिची खिल्ली उडवायचा आणि तिचा जीव चिरखी आणायचा . ती त्याच्यावर निशब्द व्हायची .
बोलण्यासारखं काही तिच्याकडे रहायचं नाही .
म्हणून स्वतःच विषय स्टॉप करायची ....आणि नवीन विषयाला हात घालायची ...
तो पण समजूत दार होता ..त्यामुळे नात्यात अडी निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता ...
खूप छान नातं त्यांचं रंगल प्रेमाने आता खूपच छान वळण घेतल होतं ..पण वेळ त्यांच्यात वेळेची खूपच कमतरता होती .. इच्शा असूनही ते एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते . दोघांनाही वाईट वाटायचं मन खूप हळवं व्ह्यायच . पण एकमेकांना समजून घेण्या पलिकडे त्यांच्या हाती काहीच नव्हत .
त्याने ज्यादिवशी तिच्यासाठी वेळ काढला होता . त्यादिवशी तीही जरा फ्री होती . म्हणून त्याच्याशी बोलू शकली होती . त्याने बोलता बोलता डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला . तिला खूप छान वाटलं , पण तिने कॉल कट केला . त्याने तिला परत कॉल केला , परत तिने कट केला . मग तिसऱ्यांदा तिने रिसिव्ह केला आणि मोबाईल स्क्रीन वर केली . तिने त्याला आपला चेहरा दाखवला चं नाही . त्याने मग व्हिडीओ कॉल कट केला आणि व्हाइस कॉल केला . थोडंसं बोलले ते एकमेकांशी ती बोलता बोलता बोलून गेली . तू तर कॉल करणार नव्हता ना मग कसं काय केला ? "
असं ती विचारत नाही तर लगेच त्याने कॉल कट केला .
आणि मेसेज केला " बघ तू म्हटली ना कॉल कट केला ." " अरे तू असा कसा रे खरच ग्रह फिरतात राहुल तुझे "
😂😂🤣🤣🤣तो ह्याच्यावर फक्त हसला .
त्याने स्टिकर्स पाठवून तिला खूप हसवलं . सारे hurt स्टिकर्स होते . अलगद त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचत होत . पण खरच तसचं असेल
का ? इथे ती जराशी अडकत होती .
पुढे जाऊन त्यांची स्टोरी खूप छान रंगात चालली होती .
दोघेही एकमेकांना आयुष्भर साथ देण्याची सुखी संसाराची स्वप्न बघत होते . माहीत होत एकमेकांच्या आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही . तरीही एकमेकांना जिवापाड जपणार अशी त्यांची शपथ होती . त्यांनी घेतलेली . त्यांची लव्ह स्टोरी कुठेतरी थांबणार होती हे दोघांनाही माहीत होतं . तरीही त्यांनी एकमेकांशी concet रहायचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असं ठरवलं होतं .
आणि तसचं झालं राहुलला एका खूप छान मुलींचं स्थळ आलं . त्याच्या आईने खूपच फोर्स केलेलं म्हणून त्याला नाईलाजाने लग्नासाठी होकार द्यावा लागला .
रिदिमा राहुलची होणारी बायको एक छोटी मोठी अॅक्ट्रेस होती . फिल्म इंडस्ट्रीत करियर करायचं . हेचं तिचं स्वप्न होत . हे त्याला सुरुवातीला माहीत नव्हतं . लग्न झाल्यानंतर त्याच्या स्वप्नाशी तिची गाठभेट झाली होती . तो पर्यंत त्याला तिच्याबद्दल काहीचं माहीत नव्हत . त्याला एकदम सिंपल मुलीशी लग्न करायचं होत . त्याच्या आईची मनापासून सेवा करणारी आणि आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी बायको त्याला अपेक्षित होती .पण नियतीने त्याच्या अपेक्षांचा अपेक्षाभंग केला . त्याला त्याच्या मनात असणारी छबी भेटलीच नाही ..भेटली ती काहीतरी वेगळीच अनोळखी.
राहुलचं लग्न झाल्यानंतर 1 महिन्याने नित्याला कळत की राहुलचं लग्न झालं . ते ही शशी कडून तोपर्यंत तिला त्यांचं लग्न ठरल हे सुध्दा माहीत नव्हतं . तिला अचानक कळत त्यामुळे जरा धक्का बसला होता . डोळ्यांमधून अश्रू धारा नकळत वाहू लागल्या होत्या . शशी तिला सहज विचारतो , " एवढी मोठी गोष्ट राहुल ने तुझ्यापासून लपवून ठेवली . तुला सांगितल नव्हत त्यांचं लग्न ठरलं म्हणून ."
त्यावर नित्या डोळ्यांमधले अश्रू पुसत त्याच्या मेसेज ला रिप्लाय करते . " अरे सांगितल होत मला त्याने त्याच्या बायकोचा फोटो पण पाठवला होता . पण लग्नाला मी नव्हते येऊ शकणार म्हणून नाही आले . बाकी काही नाही . चल बाय आता बोलू नंतर . " अस म्हणत तीने कॉल कट केला . आणि राहुल ला hi , how are you असा मेसेज टाकला . एक दीड महिन्यापासून एकमेकांशी बोलण झाल नव्हत म्हणून कधाचीत नियतीला त्यांचं बोलणं घडवून आणायच होत . म्हणून नशिबाने आज राहुल ऑनलाईन होता . लगेच त्याने तिच्या मेसेज ला रिप्लाय केला .
" मी मस्त आहे . "
" तू कशी आहेस ? I miss you "
तिने त्याच्या ह्या मेसेजे ला त्याला रिप्लाय केला .
" मी पण खूप छान आहे . 👌👌👍👍🥰🥰🥰
अभिनंदन राहुल ...तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा एन्जॉय कर तुझ्या लाईफ पार्टनर सोबत ."💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫हे मेसेज करताना तिच्या भावना कोमजुन गेल्या होत्या . मन तळ मळ ल होतं . आपली हक्काची गोष्ट कोणीतरी हिरावून घेतली .
ह्या गोष्टीचं तिला सगळ्यात जास्त वाईट वाटलं होत .
राहुलने रिटर्न रिप्लाय फक्त thanks एवढाच केला . आणि वर मेसेज केला .
" थट्टा करत आहेस का माझी ? "
तिला काही कळलं नव्हतं म्हणून तिने म्हणजे हा मेसेज तिला केला .
त्याने , " काही नाही सोड बाय असा रिप्लाय केला ."
तो डिस्टर्ब असल्याचं तिला जाणवलं मग लगेच तिने त्याला कॉल केला . त्यानेही रिसिव्ह केला , त्याच्याही मनात होतं तिच्याशी बोलून मोकळं व्हायचं . त्यांच्यात आलेला एक महिन्याचा दुरावा त्याला आवडलाच नव्हता.
तीही लगेच सुरू झाली .
" काय राहुल बोलायची इच्छा नाही का हक्कांची बायको आली म्हणून ही मैत्रीण परकी झाली का ?"
आणि रडवले ल्या स्वरात म्हणाली i miss you राहुल "
त्याने तिला सांगितल तू रडू नकोस आणि तिच्याबरोबर स्वतःही रडायला लागला . मग तिने ही त्याची उडवली .
" मला रडू नको म्हणतोस आणि स्वतःच रडतो . "
दोघेही रडायला लागले एक क्षण स्तब्ध झाले .
मनात साठवून दुःख ,
चेहऱ्यावर दाखवू लागले सुख ..
लपवून ते रडगाणे ,
गाऊ लागले सुर प्रितीचे नव्याने ...
दुभंगलेल्या रस्त्याला ,
तुटलेल्या मनाला ,
हळव्या झालेल्या ह्या क्षणाला ,
नव्याने पुन्हा एकदा प्रेम बंधनात ,
बांधू लागली ही नियती ..
नव्याने एक वचन ती त्याला देऊ लागली ,
वचन मी पुरेपूर निभवेन राहुलची छबी तिला सांगू लागली ..
ओळखीच्याच अनोळखी झालेल्या दोन जीवांना एक करू लागली ही नियती ...पुन्हा नव्याने एका प्रेम बंधनात अडकवू लागली ही नियती ....
तो तिला सांगू लागला , " माझी इच्छा असताना ही मी तुला माझी अर्धांगिनी करू शकलो नाही . आय एम स्वारी ."
" इट्स ओके राहुल नशीब नव्हतं ते आपलं , ह्या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी मात्र मलाच तुझी अर्धांगि नी व्हायची य . पण तू मला प्रॉमिस कर तू मला ह्या जन्मात एक मित्र म्हणून कधीही अंतर देणार नाही ..."
" कधीच नाही देणार .. थॅन्क्स नित्या तू ही मला एक प्रॉमिस कर , तू ही मला एक मैत्रीण म्हणून कधीही अंतर देणार नाही .."
" शक्यच नाही ..मी वचन देते राहुल तुला मी एक मैत्रीण म्हणून कधीही अंतर देणार नाही .."
आपल प्रेम बंधन ह्या जन्मात तरी संपणार नाही . "
आयुष्याच्या कुठल्याच वळणावर आपण एकमेकांची साथ सोडणार नाही. जस नातं आपल्यात पूर्वी होतं तसचं आपण आताही ठेवू आपली कर्तव्य सांभाळून ..चालेल ना .."
"हो नक्की i love you "
" I love you to "
निभावू शकतील का ? राहुल नित्या त्याचं हे प्रेम बंधन कोणते कोणते वळण येतील त्यांच्या प्रेम बंधनात ते बघुया पुढच्या भागात ...
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ...
अप्रतिम कथा लिहिली
ReplyDelete