तुझा dipi बघून माझा बीपी हाय झाला .
Dipi बघून बीपी हाय नाही झाला तर मग ते प्रेम कसलं .👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰
मला हर्ट अटॅक एवढा बाकी राहिला होता .
तू खूप खूप छान दिसतेस. पिवळ्या साडीत एकदम शोभून दिसते .
- " बास , बास "
" का ग "
" असच एवढं कौतुक ऐकुन मी खूप हवेत जाईल . "
" अग खरच ग खूप छान दिसतेस तू "
" थँक्यू "
😊😊😊
" वरती बाकी जोक छान केला .
तुझा dipi बघून माझा बीपी हाय झाला ."😊😊😂😂😂🤣🤣🤣
" हो जोक करण माझा जन्मसिध्द हक्क आहे . आणि प्रतिलीपी ने ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे . मग बाबा ती पाळावीच लागते . नाहीतर मग ते मला आउट ऑफ करतील ना . " 😂😂😂🤣🤣🤣
" हो हो ते पण खरच आहे . " 😂😂😂🤣🤣🤣🤣
" काय रे राहुल आज पण bussy काल पण तू bussy च होता . तुझ्यामुळे मला माझा फोटो dipivr एवढा वेळ ठेवावा लागला . "
" म्हणजे "🤔🤔🤔
" काही नाही , काही नाही सोड रे ते "
" Ok as your wish "
" Hmm" 😊😊😊
" Hmm"
" बरं सांग ना आज पण bussy असणार का ? "
" ते काही सांगता येणार नाही . कामं अचानक येतात ."
" Hmm ते पण खरं आहे . "
" हो ना "
" हो मी समजू शकते . "
" बरं ऐक ना dipi बदल . "
" म्हणजे "
आता राहुलला तिला सांगायचं होत dipi बदल . पण तो असं डायरेक्ट सांगू शकत नव्हता . म्हणून तो तिला फिरवून फिरवून सांगतो .
" अगं म्हणजे तू dipi ठेवलास तर , तुला खूप सारे मेसेज येतील आणि तुला त्याचं मेसेजला रिप्लाय देत बसावे लागेलं . आणि चुकून कोणाचा बीपी हाय झाला तर . "
" होऊ शकतो का ? "
" कोणाचा होईल की नाही माहीत नाही ; पण माझा मात्र नक्की होईल . त्यामुळे बदल तू dipi प्लीज . "
" हो बदलते पण नंतर आता बोलुयात . "
" नाही आधी कर मग बोलू . "
" हो ना करते ना रे "
" आधी कर "
" ओके " असं म्हणत ती लगेच dipi change करते . "
" Good ☕☕☕ये tea घ्यायला . "
" हो मी आताच घेतला . तू घे ."
" हो बाकी काय म्हणतोस "
" बाकी काही नाही ऑफिस आणि घर हेच माझ विश्व . "
"छान आहे तुझ विश्व . "
" हो"
त्यानंतर त्यांचं बोलणं बंद होतं दोघांनाही अचानक कामं येतात . मग ते आपल्या आपल्या कामाला लागतात . कामं संपून पुन्हा एकदा बोलण्याची ओढ ही लागलेली असते . पण आता मात्र ती ओढ वाढतच चालली होती .
त्यांचं वेळेचं नियोजन कोणत्याच पद्धतीने बसत नव्हत .
ही जेव्हा फ्री असायची तेव्हा तो bussy असायचा,आणि तो जेव्हा फ्री असायचा तेव्हा ही bussy असायची . आठ दिवस हेच गणित गणिताला योग्य उत्तर मिळेना .
मग एके दिवशी सकाळी च राहुल good morning असा मेसेज नीत्याला टाकतो . बहुतेक ती bussy होती . त्यामुळे रिप्लाय दिला नव्हता . मग न राहवून तो पुन्हा एक मेसेज टाकतो . आज आपण तीन साडे तीन वाजता बोलुयात तीन नंतर मी फ्री असणार .
तिने ओके म्हणून रिप्लाय दिला होता . पण त्याच दिवशी नेमकी खूप मोठा प्रोब्लेम तिच्या आयुष्यात झाला होता .
जून वादळ उठून पुन्हा नव्यानं उभ राहील होतं , त्यालाच साथ द्यायला एक नवीन वादळ ही त्याची पाठराखी न झालं होतं .
त्या दिवशी एक वाजता तिच्या मैत्रिणीच आणि तीच खूप मोठं भांडण झालं . कारण काय तिच्या बॉय फ्रेंड ने तिला प्रपोज करण्या ऐवजी हीलाच प्रपोज केलं . हीची काहीही चूक नसताना तिची मैत्रीण हीलाच भांडली .
तू आमच्या दोघांमध्ये का आलीस ? असं म्हणत हीलाच वेठीस धरलं . तिने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकेना . आजपासून आपली मैत्री कायमची संपली असं म्हणून ती ताणाताणाने घरी निघून गेली. ती जात नाही तर ती ज्या मुलाला आवडायची तो मुलगा घरी आला . आणि पुन्हा जुन्या विरळेल्या खपल्या ओल्या करून गेला .
ती त्या दिवशी रड रडली आपली काहीचं चूक नसताना जग आपल्याला वेठीस धरून मोकळं होतं .
आपण ज्याच्यासाठी एवढं केलं तिनेच आपल्याला दूर केलं . ज्या माणसाचा कधी आपल्या अस्तित्वाशी संबंध नव्हता , त्याने आपल्या अस्तित्वाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळ असं का ? काय चूक आहे देवा माझी अस म्हणत ती देवासमोर खूप रडली . एवढी रडली की शेवटी तिची डोकेदुखी सुरू झाली .
थोड्याच वेळात ती भानावर आली . सकाळी राहुलने केलेल्या मेसेज ची तिला आठवण झाली .
राहुलचा hi म्हणून दोनदा मेसेज आलेले असते . तिला बोलण्याची इच्छा नव्हती त्याला वाईट वाटेल म्हणून ती बोलते . थोड ते चांगले बोलतात राहुलचा स्वभाव मुळातच कॉमेडी त्यामुळे वेळ काळ न बघत सतत तो कॉमेडी करत असतो .
आज ती बिलकुल मूड मध्ये नव्हती . अशातच गैर समज निर्माण होतात आणि ती राहुल ला अचानक बोलून जाते.
तुला लग्नानंतर मैत्री तोडायची असेल तर , मग आताच आपण आपली मैत्री थांबवु या . नंतर भानावर न राहता . सकाळपासून घडलेल्या सर्व घटनांचा राग ती त्याच्यावर काढते . त्याला पण खूप वाईट वाटतं . तो by ok म्हणून रिप्लाय येतो . त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर ती पुन्हा खूप रडते.
थोड्या वेळाने शांत झाल्यावर ती पुन्हा भानावर आली . मोबाईल तिच्या हातात तसाच होता . ती पुन्हा त्यांचे मेसेज वाचते . डोक्याला हात लावत पुन्हा खूप रडते . आपण आज सगळा राग उगाच राहुल वर काढला . किती वाईट वाटलं असेल बिचाऱ्याला आपणही तेच केलं ना ज्याची चूक नव्हती त्यालाच वेठीस धरलं .
ती पुन्हा राहुल ला स्वारी म्हणून खूप मेसेज टाकते . पण तो आतून इतका दुखावला गेला होता . की त्याला सावरायला थोडा वेळ लागणार होता .
पण हिला मात्र खूप भीती वाटतं होती . राहुल पुन्हा आपल्याशी कधीच बोलला नाहीतर , आमची मैत्री कायमची तुटली तर अशा प्रश्नांनी मनात घर निर्माण केलं होतं .
काय वाटतं तुम्हाला बोलेल का राहुल नित्याशी पुन्हा नव्याने सुरळीत येईल का त्यांची मैत्री नव्या वळणावर .
बघुया पुढच्या भागात .
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठावर क्लिक करा ..
No comments:
Post a Comment
Comments plz.