ती bussy नेहमी असते . पण त्याच्यासाठी आवरजुन
वेळ काढते . वेळ द्यायला जमलं नाही तर , निदान एक मेसेज तरी करते . तरीही ती त्याच्यासाठी कुठेतरी कमीच पडते .
तो हा रिप्लाय वाचून तिच्या इनबॉक्स मध्ये एक मेसेज करतो . स्वारी म्हणून ती ऑनलाईन असल्यामुळे लगेच त्याला रिप्लाय देते . " आधी मन दुखवायचं आणि मग स्वारी बोलायचं . समजून नाही घ्यायचं तर मग हे नातं कसं टिकायच ."
" स्वारी यार खरच स्वारी "
" इट्स ओके . Bussy आहेस का ? "
" नाही . फ्री आहे म्हणून ऑनलाईन ."
" वाटलच मला wp vioce चालेल . "
" मनातलं बोललीस ."
" चल मग wp वर लवकर मी वाट बघतेय . "
" आलोच . तू हो पुढे . "
ती त्याला कॉल करते . खूप दिवसांनी ते एकमेकांशी बोलत होते , अश्रू अनावर झाले होते . तिने आज त्याला कॉल काही गोष्टी नीट समजावून सांगण्यासाठीचं केला होता . त्यालाही तिची मनस्थिती समजून घ्यायची होती .
मैत्रीची थांबवण्याची त्याची तयारीही होती . पण तिलाच ही मैत्री हवी होती . त्यामुळे ती मैत्री तो निभवण्याचा प्रयत्न करत होता .
गुंतलेला होताच तिच्यात ,
बोलू कधी शकला नाही ...
मान्य करूनही त्याने मान्य केले नाही ..
तिच्यासाठी अश्रू त्याचे कधी थांबले नाही ..
ती आयुष्यात असो नसो तिच्यासाठी तो रचत होता खूप काही . कधी तिच्या रचनेत , कधी तिच्या कवितेत स्वतःला शोधत होता . तिच्यासोबत त्याचे आयुष्य जोडू पाहत होता . तीही same तेचं करत होती . गुंतली होती त्याच्यात . त्याच्यासाठी एक अनोखे स्थान निर्मिले होते तिने तिच्या मनात कायमचे बंधिस्त करून ठेवले होते , त्याला तिच्या हृदयात .
त्याने तिला विचारल , " कशी आहेस ? "
" मी मस्त आहे . तू कसा आहेस ? "
" मी एकदम झकास . काय झालं नक्की ठरल का लग्न "
" हो ठरलंचं नाही तर सुपारी पण फुटली . "
" व्वा क्या बात है ! डबल धमाका ! "
" हो ऐक ना . "
" काय ग . "
" आता आपल्याला थोड्या कॉम्प्र माई ज कराव्या लागतील . "
" म्हणजे "
" अरे समजून घेणा जरा ..."
" हा...आता तुला माझ्याशी बोलण्याची इच्छा नसेल ना आता संपली ना आपली मैत्री . "
" कोणी सांगितलं असं नाही . आपली मैत्री कधीही संपणार नाही . गॉड प्रॉमिस ."
" मग कसलं कॉम्प्र माई ज .."
" आपलं वेळेचं समीकरण बिघडत म्हणून अजिबात चिडायचं नाही . रागवायच नाही , अबोला धरायचा नाही.
एकमेकांना शक्य तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. "
" ओके तेच करत आलो ना आतापर्यंत . "
" कोणी केला रे प्रयत्न "
" तूच . तुझा जन्मसिध्द अधिकार आहे ना तो समोरच्याला समजून घेणे . "
" हो आहे पण आता तू ही समजून घ्यायला हवं . थोड मला आता माझ्यावर एक नवीन जबाबदारी आहे . ती मला पुरेपूर पेलायची आहे . प्लीज समजून घे मला . "
" ओके i can understand ! You dont warry .."
" थँक्यू ! "
" बरं कसा आहे होणारा पती ."
" खूप छान आहे . Dashing अगदी मला हवा होता, तसाच आहे . "
" व्वा नशीब काढलं तू "
" ते काय माहित अजुन , आता तरी चांगला वाटतो . नंतर ग्रह फिरले तर त्याच सांगता येणार नाही . पुरुष आहे कधीही बदलू शकतो . "
" म्हणजे म्हणायचं काय आहे तुला ."
" काही नाही सोड जाऊ दे तुला नाही कळणार कधी स्त्रीची व्यथा . "
" म्हणजे "
" अरे सोड ना "
" ओके "
" बरं ठेवू का आता "
" का ग . हो मिस्ट रांचा कॉल येत असेल . माहितेय मला . मुली ना खूप सेल्फिश असतात . "
" म्हणजे अरे ! असं काही नाही . पेपर आहेत माझे म्हणून जरा स्टडी . "
" स्वारी "
" Hmm . जरा विचार करून बोलावं माणसानं , सर्व मुली सारख्याच नसतात . "
" हो . म्हणूनच तर आजपर्यंत आपली मैत्री टिकून आहे ना . "
" आणि यानंतरही असेल कायमस्वरूपी . "
" तिचं आशा आहे . "
" आशाची निराशा कधीही होणार नाही . हा विश्वास माझा . "
" तो विश्वास कायमस्वरूपी टिकू देत हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना . "
" टिकेल . तथास्तु ! "
" Thankyou so much from bottom of my heart "
" ओके बर आता खरचं ठेवते मी . "
" ओके बाय बोलू नंतर , काळजी घे तुम्हा दोघांचीही "
" हो नक्की तू पण घे रिदिमा ची काळजी . "
" घेतोय म्हणून आजपर्यंत जिवंत आहे . नाहीतर केव्हाच देवाला भेटायला गेलो असतो . "
" ओके बाय " अस म्हणत ती फोन कट करते . आणि आपल्या कामाला लागते . "
तिचे पेपर असल्यामुळे तिचं आणि राहुलचं बरेच दिवस बोलण होतच नाही . त्यांच्या नात्यातील संवाद हा संपला होता . तिच्या लग्नाची तारीख ही फिक्स ठरली होती . लग्नाला आठ दिवस बाकी असताना ती राहुल ला wp वर लग्नपत्रिका आणि आग्रहाचं निमंत्रण देते . राहुल काहीही कर पण लग्नाला नक्की ये . तू आणि रिदिमा दोघेही ती नाही आली तरी तू नक्की ये . मी वाट बघेन तू आल्याशिवाय मी लग्नमंडपात जाणार नाही .हे लक्षात ठेव . "
राहुल तिचा मेसेज बघुनही तिला रिप्लाय करत नाही . ती खूपच hurt होते . माझ्या आयुष्यातील हे एवढे आनंदाचे दिवस आहेत . हा असा चिडका वागून का खराब करतो . जाऊ दे सोडून देते मी ह्याचा विषय हा जरा जास्तच भाव खातो . "
ती आतुरतेने वाट बघत असते त्याच्या मेसेज ची पण काही रिप्लाय आलाच नव्हता . ती हिरमुसून जाते . अश्रू आज तिचे बरसू लागले होते . "
आज तिची मेहंदी होती , त्या मेहंदी वर त्याच्या आठवणींचे अश्रू ती सतत टिपत होती . सारखा मोबाईल फोन हातात घेऊन रिप्लाय आला की नाही चेक करत होती . उद्या हळद होती , पण म्हणावे तसे तेज आज तिच्या चेहऱ्यावर नव्हते . ती पार कोलमडून गेली होती .
होणाऱ्या नवऱ्यापेक्षा आजही तिला तिचा मित्रच अनमोल होता . ते स्पष्ट स्पष्ट दिसत होते . "
हळदी च्या दिवशी ती सगळ्यात आधी उठली . रेडी झाली नवरी असल्यामुळे तिला फार काम नव्हतीच निवांत होती .
ती जाऊन बागेत झुळणाऱ्या झोपाळ्यावर जाऊन बसली . हातात मोबाईल फोन होताच data पहिलं notification आलं . R . Patil च तुझ्या घराचा मेन adress काय ? तो लगेच तिला कॉल करतो .
स्वारी मी मेसेजला रिप्लाय केला नाही . " तुला serprise द्यायचे होते . पण adress माहीत नाही ना .
म्हणून serprise serprise नाही राहील . "
ती खूप हसली त्याच्यावर काय रे तू किती खडूस आहेस.
ती त्याला adress सांगते . पुढच्या दहा मिनि टा तचं तो हक्काच्या हक्का राहुल पाटील तिच्या समोर येऊन उभा राहतो . आकाश ठेंगणे झाले होते तिला . तिने कसलाच विचार न करता जाऊन त्याला एक घट्ट मिठी मारली . आणि ती खळखळून रडली . आणि तिच्या तोंडातून केवळ एकच शब्द बाहेर पडल . " Thankyou so much "
" Its ok " म्हणत तो ही तिला प्रतिसाद देऊ लागला .
थोडा वेळ तिथेच त्या झोपाळ्यावर बसून ते एकमेकांशी गप्पा मारत होते . काही गोड क्षण त्यांच्या आयुष्यातील वजा झालेले पुन्हा पुन्हा आठवत होते .
थोड्याच वेळात तिची आई आली आणि तिला विचारू लागली .
" कोण ग हे ? "
" मित्र आहे लग्नासाठी आलेला . "
मित्र कोणाचा असं म्हणत नाही तर तिचे वडील येतात तेवढ्यात तिच्या आईकडे " अग ते जावई बापूचे मित्र येणार आहेत . त्यांच्या राहण्याची सोय चांगली कर ."
असं म्हणून ते जातात . आणि तिची आई त्या राहुल लाच अग बाई तुम्ही जावं ई बापूचे मित्र का ? मी भी ना जरा वेंधलीच आहे . तुम्हाला काय हवं नको ते मला आग्रहाने सांगा . "
त्या दोघांच्याही मनात लड्डू फुटत होते . नियतीने आज सर्वकाही त्यांच्या मनाप्रमाणे केले होते .
तो " हो नक्की सांगेन काकू "
"बरं बाळा मी येते बोला तुम्ही "
" हो "
ते दोघेही एकमेकांकडे बघून मोठं मोठ्याने हसू लागले . राहुल आज राज्य आपल आहे . आता तू माझ्या नवऱ्याचा मित्र बाबा मजा आहे तुझी . "
" काय माहित कोणाला कळायला नको मी तुझा मित्र आहे ."
" हो रे खरच आपण जरा काळजी घेऊ . "
" हो नक्की "
काय वाटतं तुम्हाला ते लपवून ठेवू शकतील का तो त्याचा नाही तिचा मित्र आहे . हे गुपित मला ही उत्सुक ता आहे पुढे काय होणार याची .
बघुया पुढच्या भागात कोणत्या नवीन वळणावर जाते हे प्रेम बंधन ...
मागील भाग वाचण्यासाठी मागील पृष्ठ ह्या ठिकाणी क्लिक करा ...
थँक्यू 🙏🙏🙏🙏
खूप छान....👍✍️🍫👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete