माझ्या जीवा भावाच्या सखीची ...
ती निःशब्द होती ,
तुडुंब भरलेल्या नयनात ,
तिची कहाणी दडली होती ...
ओठांवर हलकेसे येणार हसू ,
काय बाई मी तिची व्यथा सांगू ..
भावना तिच्या मी समजू शकते ,
इवल्याशा तिच्या रोपटला ,
गर्भात वाढवलेल्या तिच्या पणतीला ,
ढुंकूनही न पाहिले तिच्या सासूने ,
हळवे तिचे मन सांगत होते मला हक्काने ,
काय बाई हा डाव मांडला नियतीने ,
काय करावे आजच्या सुशिक्षित पिढीने .....
विचारत होती मला तिची भाषा रसाळ ,
तुझी प्रिन्सेस आहे मधाळ ,
जिवापाड कर ग तिचा सांभाळ ...
एवढेच मी बोलू शकले ....
आजही खूप ठिकाणी पहिला मुलगाच हवा असतो ,
मी माझ्या दोन मैत्रिणींच्या कहाणी पहिल्या त्यावरून लिहिले ...खरच किती मागासलेल्या विचारांचा आहे आजही हा समाज मला तर खरच खूप चीड येते . एका सासुरवाशिनीची व्यथा मी फारच कमी शब्दात सांगितली .
खेड्यात - पाड्यात आजही सासुरवास होतो . सुनांना कुठे साधं बाहेर जायचं असेल , तर तीन ते चार वेळेस घरच्यांची परमिशन घ्यावी लागते . न सांगताच सून कुठे बाहेर गेली तर , तिला घरात ही घेतल्या जात नाही . मी स्वतः पाहिलेल्या घटना आहेत . माझ्याच कॉलनीत पाहिलेल्या आहेत ...
सून कमवत असली तरी तिला तिचा स्वतःचा पैसा सासूच्या हाती द्यावा लागतो . जेव्हा तिला एखादी गोष्ट खरेदी करण्याची इच्छा झाली . आणि सासू कुठे बाहेर गेली असेल तर , तिला ती इच्छा अनेकदा मारावी लागते .
कित्येकदा पहिला मुलगाच हवा , ह्या हट्टाहासाने तिचे अनेकदा गर्भपात केले जातात . तिला न सांगताच तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातात .
अनेक मुलींना लग्नानंतर शिकण्याची इच्छा असते . पण ती इच्छा पूर्ण करण्यात येतच नाही . खरच मला खूप वाईट वाटतं . काही काही गोष्टीबद्दल खूप तिरस्कार आहे माझ्या मनात तो तिरस्कार कधी संपणार पण नाही .
आज तिच्या पानवलेल्या डोळ्यांनी ,
खूप काही सांगितल ,
मी इतक्यात तरी लग्न करायचं नाही ..
असच आज ठरवल ,
नकोय मला एवढ्यात एवढा ताण ,
सुंदर आयुष्यात पिढा ही घान ....
ह्रदयस्पर्शी लिहिले स दुर्गाताई ही मानसिकता बदलायला हवी समाजाची
ReplyDelete