आयुष्यमान भव: !
तू चल पुढे ..मी तुझ्या पाठीशी आहे ..
वादळात ही तुझ्या सोबत आहे ..
खाचखळग्यात ही तुझ्या सहवासात आहे ..
अभिमान मला ..
मी माझ्या बाळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे ..
कधी त्याची सावली होऊन ..तर कधी त्याची प्रतिमा होऊन ..
कुठल्या ना कुठल्या रुपात त्याच्या हाकेला धावून जातं आहे ..
खंत नाही ..
त्याला ऊन्ह - सावलीचा खेळ शिकवते ..
अपयश येता त्याला नव्याने all the best म्हणते .
धडपडता तो दुरूनच त्याची गमंत बघते ..
कौतुक माझे मलाच वाटते ..
मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने घडवते...
रोज नव्याने all the best म्हणते ..
आयुष्यमान भव: !
नेहमी तुझा विजय असो ..
असं म्हणत त्याला भरभरून आशीर्वाद देते ..
Written by - durga mate
अप्रतिम सुंदर लिहिलय नित्या
ReplyDelete