तू गायलेली मंजुळ गाणी.
सहज कानी पडतात ...
मंजुळ तुझी वाणी ..
माझ्याचसाठी स्वर बनुन नटतात.
नदीच्या किनाऱ्यावर अलगद ..
तू हात हाती देतो ..
सप्तपदी चालण्याचे स्वप्न रोजचं बघतो ..
नीरव शांततेतील तो चंद्र ही सुरेल गातो ..
माझ्याशी लपाछपीचा खेळ त्याचा रोजचं रंगतो ..
चांदणी ढगाआड लपलेली नाजूक लाजते ..
जेव्हा माझ्या सख्याची माझ्यावर नजर खिळते..
तू गायलेली मंजुळ गाणी ..
सर्वांनाच आवडती ...
त्या वाणीत सुर्य- चंद्र - तारे ही ..
त्यांचे स्वर मिसळती ..
No comments:
Post a Comment
Comments plz.