आवडलं असतं मला ...
मुलगा म्हणून जन्माला यायला ..
आवडत असतं मला...
आई वडिलांची जबाबदारी स्वीकारायला .
आवडलं असतं मला ..
एक सच्चा नागरिक म्हणून मिरवायला ..
शिवबाचा शिवभक्त व्हायला ..
त्याचेच गुण आत्मसात करायला ..
खरच आवडलं असतं मला ..
मुलगा म्हणून जन्माला यायला ..
स्त्रियांवर होणारे अत्याचार - बलात्कार ..
थांबवण्यासाठी यायला हवं होतं ..
मी मुलगा म्हणून जन्माला ..
अनेक भगिनीच दुःख दूर करायला आवडल असतं मला .
जगातील सर्वात भाग्यवान स्त्रीच्या ..
भाग्याचं कारण व्हायला आवडल असतं मला .
राधा सारखी एक मैत्रीण ,
आयुष्यात कमवायला आवडल असतं मला ..
खरच एक मुलगा म्हणून जन्माला यायला आवडल असतं मला ..
एक आदर्श पती ..
मुलगा आणि एक आदर्श व्यक्ती महत्व व्हायला आवडल असतं मला ..
खरच ह्या आधी ..
मुलगा म्हणून जन्माला यायला आवडलं असतं मला .
स्त्री आदर्श असतेच हा जन्म मला प्रिय आहेच .पण ह्यापेक्षा ही जास्त आवडलं असतं मला मुलगा म्हणून जन्माला यायला ..
No comments:
Post a Comment
Comments plz.