नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 15, 2022

भाग्यवान मी ..

तो  आपल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेणार . 
त्याच्या सोबत आपल्याला सात पावलं चालावी लागणार
त्याच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्णचं वाटणार .
तो आला की आयुष्याला पूर्णत्व मिळणार . तो अनोळखीच असतो . आई वडील योग जुळवतात . त्याच्या हातात आपला हात देतात . त्याला आपला जीवनसाथी म्हणून निवडतात . आणि ह्या साऱ्या filings त्या खास माणसासाठीचं असतात . 

खरचं हा अनुभव आहे . माझा स्वतःच . जेव्हा माझ लग्न ठरलं तेव्हा मी बिलकुल खुश नव्हते.  मला ह्या मुलासोबत सात पावलं चालायची होती की नाही माहीत नाही.  पण सुरुवातीला मला हे लग्न नकोच होत. त्याला विविध कारण आहेत . ती मी सोशल मीडिया वर नाही सांगत . 

पण जेव्हा आमच्यातील छोटे मोठे जे गैरसमज होते ते दूर झाल्यानंतर मी खूप खूष राहू लागले . त्याच्यासाठी जगण्याची स्वप्न पाहू लागले.  

तो बिचारा साधा भोळा मनाने खूप चांगला . खूप बिझी असतो . संपूर्ण फॅमिलीची जबाबदारी त्याच्यावरच.  खर तर मला त्याची कीव येते . की एवढं काम करूनही त्याला स्वतःला जेवण्यासाठी वेळ नसतो .  आणि  तो मला वेळ देत नाही . म्हणून मी त्याच्यावर तान खाते.  एक दिवस कॉल करते . तर पुढचे चार दिवस कॉल करत नाही . तरीही तो बिचारा काहीही मनावर घेत नाही . लहान समजून माफ करतो .

खरचं मी खूपच लवकर त्याच्या प्रेमात पडले . खर  तर , त्याच्या भेटीत मी जून सारं विसरले . त्याच्या रंगा रुपावर नाही .तर त्याच्या स्वभावा वर भाळले . 

मी अल्लड तो खूप शांत ..
मी ही घेते समजून ..
तो ही घेतो समजून ..
म्हणून तर सारे येते उमजून ..

खरचं खुप भाग्यवान आहे .मी मला एवढा छान लाईफ पार्टनर मिळाला . खूप शांत आणि निरागस त्याला पाहिलं ना तर जगावेगळी फिलिंग होती . आणि ती स्पेशलचं असते ...मी आता खऱ्या अर्थाने पुर्ण झाले .दोन शतके ओलांडलेला कोणीतरी माझा हक्काचा माझ्या आयुष्यात माझी एक गोड smile बनुन आला ..
थँक्यू डिअर ..

पण एक तक्रार अजुनही आहे . तो मला कधीचं स्वतःहून कॉल नाही करत 😔😔😔. पण त्यासाठी एक दिवस भांडनार आहे मी चांगली ..हा पण समजून उमजून त्याला आयुष्यात कधीच दुखावणार नाही .😊😊

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...