एक धागा विश्र्वासाचा कळत नकळत जुळल्या जातो . तो क्षण आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण असतो. एका मनाचा दुसऱ्या मनाशी थेट संवाद साधला जातो . आयुष्य परिपूर्ण होतं जेव्हा एक हळवं मन दुसऱ्या हळव्या मनाला पूर्णपणे समरपित होतं . आणि तिथे जुळला जातो . एका धागा विश्वासाचा ..सुरू होतो प्रवास एका सुरेल नात्याचा .
हा लेख मी मनाचं समाधान म्हणून लिहिते आहे .
लग्न एक प्रथा खऱ्या आयुष्याची नवी सुरुवात ..ही सुरुवात एकमेकांना समजून घेत ह्यावी . एकमेकांना वेळ देण्याची ओढ असावी . एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा अधिकार असावा . कायम तुझी सावली बनुन साथ देईल . तुझी साथ कधीच सोडणार नाही . तुला स्वतःपेक्षा जास्त जपेंन ही वाक्य बोलली नाही तरी चालतील .
पण नात्यात फ्री पणा असावा ..एकमेकांवर अधिकार गाजवण्याआधी एकमेकांचे मित्र होऊन एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे .
एक धागा विश्वासाचा जुळन्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांना वेळ काढून वेळ देता आला पाहिजे . सुरुवातीच्या स्वतः पेक्षा जास्त विचार आपल्या लाईफ पार्टनर च्या मनाचा करता यायला पाहिजे .
लग्न ही फक्त एक प्रथा नाही हे . ही एक सुरुवात आहे . एका अनोळखी व्यक्तीचं आयुष्य दुसऱ्या अनोळखी व्यक्तीशी जुळल्या जात. एका वेगळ्याच बंधनात आपण बांधल्या जातो .त्या बंधनात जेव्हा आपण बांधल्या जातो . तेव्हा आपण थोड्या काळासाठी स्वतःला विसरून गेलो तरी चालतं . पण ज्याच्यासोबत आयुष्य भरासाठी बांधल्या जाणार आहोत . त्याला क्षणोक्षणी आठवता आलं पाहिजे . त्याच्या मनाशी संवाद साधता आला पाहिजे .
एका नवीन आयुष्याची सुरुवात करताना एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांना वेळ देणं सर्वात महत्वाचं असतं . तरच ते नातं पूर्णत्वास जातं . नाहीतर आयुष्य एकमेकांस समजून घेण्यातच जातं जगणं जगायचं राहून जातं . त्यामुळे एका नवीन नात्याची सुरुवात करताना सर्वात आधी एकमेकांना वेळ द्यायलाच पाहिजे . आणि एकमेकांना समजून घेण्याची कला अवगत करता आली पाहिजे ..
दुर्गा मते
छानच 👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷
आबा
🙏