नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 3, 2022

संवाद संपला ..

वारंवार अविश्वास दाखवत होते तुझ्यावर .
तू कधीचं अविश्वास दाखवला नाहीस माझ्यावर .

मी शेवट पर्यंत प्रामाणिक राहिले ..
तू मात्र तुझ्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवले ..

मी इमोशनल तर तू प्रॅक्टीकल ..
त्यामुळेच नाही राहिली नात्याची ही विण सेंसिबल ..

तुला ताणून धरन्याची सवय ...
मला नेहमीच तुला मनवण्याची ..
काळजी होती ना आपल्या नात्याची ..
त्यामुळेचं जडली  तुला सवय मला गृहीत धरण्याची ..

जी चिंधड्या चिंधड्या उडवत होती माझ्या स्वाभिमानाची .

मी दाखवली मग मक्तेदारी अविश्वासाची ..

त्याच मक्तेदारिने धागा तोडला तुझ्या माझ्या मैत्रीचा .

शेवट झाला एका सुंदर नात्याचा ..

सुरू झाला प्रवास जिवंतपणीच
मरण यातना  भोगण्याचा ...
सवांद संपला दोन मनाचा ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...