रुते पायात काटे ..
स्वप्न हे उरात दाटे .
मजला अभिमान वाटे ...
भेगाळलेल्या भिंती ..
पाहून मजला हसती ..
आभाळ भरून येता ..
थेंब थुई थुई नाचती...
गार वारा स्पर्शून जाई ..
अंधाऱ्या खोलीत माझ्या .
बडबड गीत गाई ...
चांदणे सोबतीला येई ..
अंधाराला
प्रकाशाची साथ देई .
झोपडीत माझ्या ज्योत नवी जन्म घेई ...
परिस्थितिचा अभिमान वाटे मला ..
सांगू मी कुणा कुणाला ..
काही कले मला ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.