आपल्या नात्याचा शेवट व्हावा ..
हे माझ्या ध्यानी - मनी ही नव्हतं ...
तरीही माझ्यासोबत एंगेज राहण तुला मान्य नव्हतं ..
सांग ना ..?
एवढी कमकुवत होती का रे ? आपली मैत्री
माझ्याशिवाय पान ही हालत नव्हत ..
माझ्या शिवाय आयुष्य तुझ अपूर्ण वाटतं होतं .
माझं लग्न ठरलं आणि तुला मला इग्नोर करणं सोपं वाटलं .
सांग ना ..?
इग्नोर हा ऑप्शन आपल्या मैत्रीला परफेक्ट ठरला .
आपली मैत्री खूप छान होती .
मान्य आहे का ती केवळ मैत्रीचं होती ..
छे छे ...
ती ना मैत्री होती ना प्रेम होत.
ती तर जगातील सर्वात सुंदर नात्याची विण होती .
साक्ष देत होती नव्याने जन्मलेल्या राधा कृष्णाच्या नात्याची ...
सांग ना ? हे पटतय का तुला ??
मी दुसऱ्याची झाले ..
म्हणून ही विण तुटावी ,
एवढी कमकुवत होती का रे ही विण
सांग ना ...
दुर्गा मते
निशब्द भाव मांडले आहे.
ReplyDelete