समुद्राच्या लाटेत वाट बघण सामावल ..
सख्या तुझ्या भेटीत आयुष्याचं सुख गवसल ..
तुझी साथ लाभली ..
जशी धरणीला आकाशाची किनार मिळाली ..
मुरगळेल्या फुलाला ही गंध आला .
तुझ्या भेटीत सारा आसमंत गहिवरला ..
हरवलेली स्वप्न पुन्हा नव्याने भेटली ..
वाळवंट आयुष्य होईल भीती मनात होती दाटली .
तुझ्या येण्याने ती अनामिक भीती ही लयास गेली ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.