उगाच लेक परक्याची धन नाही म्हणत ...ह्या वाक्यात पॉइंट आहे . तिचं सिध्द करते ती परक्याच धन आहे . ते तिच्या वागण्यातून तिच्या बोलण्यातून ती व्यक्त होत असताना सहज जाणवत एकदा तिचं लग्न ठरलं ना की, ती कळतं नकळत फक्त सासरचा विचार करते . आई मला हे माझ्या घरी न्यायचं .मी लग्न झाल्यावर हे घेऊन जाणार ते घेऊन जाणार . तिच्या हक्काच्या घरी असताना ही ती तिच्या सासरचा विचार करत असते .
आणि त्यातून ती कळतं नकळत ती स्वतःच सिध्द करत असते . की मी इथली पाहुणी आणि परक्याची अमानत आहे .
मी हा लेख स्वतःच्या अनुभवावरून लिहीत आहे .
जेव्हा माझ लग्न ठरल तेव्हा मी नाराज होते . पण जेव्हा मी सासू सासऱ्याशी व नवऱ्याशी बोलण सुरू केलं. तेव्हा पासून मला त्याची खूप ओढ लागली . आमच्यात खूप छान नातं निर्माण झालं . आता तर मला त्यांच्याशी दिवसातून एकदा तरी बोलल्याशिवाय करमतचं नाही .
खरचं एका मुलीचं खरं घर तिच्या हक्काचं घर हे तिचं सासरच असतं . हे लग्न झाल्यावर नाही तर , लग्न होण्याआधी चं सिध्द होतं . आणि तिलाही मग माहेर पेक्षा सासरची ओढ अधिक असते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.