एकाकी प्रवास जेव्हा करते .
तेव्हा तुझीच आठवण येते ..
आयुष्यात बऱ्यापैकी सेटल झाले .
तरीही अजुन तुझ्यातच आहे कुठेतरी अडकलेली ..
फुलस्टॉप जेव्हा येतात ..
तेव्हा विरह यातना मजला छळतात .
नव्याने जन्म घेतलेल्या नात्याच्या ओढीने ..
तुला विसरण्याचा प्रयत्न करते ..
विसरूनही पुन्हा पुन्हा तुला आठवते ..
तू पहिलं प्रेम आहेस माझं ..
तुला विसरु तरी कशी रे ?
तुझ्या सोबत आयुष्य घालवण्याचे भाग्य नाही मिळाले .
तुझ्या आठवणीत जगण्याचे पुण्य कमावते रे ..
फक्त तुझीच मी ..
तुझ्या आठवणीत जगणारी मी ..
No comments:
Post a Comment
Comments plz.