एकांत हा सूना सूना
तुझ्या मैफिली शिवाय ..
सांग सख्या
सुर कसे मी गाऊ ..
तुझ्या सहवासाशिवाय ..
चिंब ओल्या पावसात मी कशी बिजू ..
बिजलीच्या तालावर ठोका कसा धरू
मोरपिसा वरील छटा मी कशा शोधू
त्यावर स्वप्न प्रितीचे कसे रेखाटू ..
ह्या एकांतात तुझी प्रतीक्षा करण सोडू कशी .
आठवतय का तुला ?
तुझ्याशी अबोला धरलाय का कधी ?
तुझ्या शिवाय आनंद साजरा केलाय का कधी ?
सांग सख्या तूच सांग !
तुझ्याशिवाय सुर मी गाऊ कसे ?
तुझ्या सहवासाशिवाय सण मी साजरे करू कसे ?
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.