सकाळी एक स्वप्न पडलं ..
सत्यात कधीच न उतरणार ..
मला माझ्याच विश्वात हरवून टाकणार ..
ओठांवर नाजूक स्मित फुलवणार ..
मनमोहक अदा त्याची मनावर कोरली ..
होणार उद्या नवरी मी ......
प्रीत कोवळी लाजली ..
राजाची ओढ मजला छळू लागली ..
भास अनोखे डोळ्यासमोर दाटले ..
प्रभात वेळी स्वप्न हे नवखे ..
पडू लागले .....
मी आजीबाई कशी होणार नवरी ..
नातीला पडणार स्वप्न रचू लागले ..
आणि खूपच हसले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.