किती सुंदर सजलाय बगीचा ..
चल आपण करू कविता ...
फुला फुलाचे रंग पाहू ..
उडत्या फुलपाखरांना गुंज सांगू ..
धबधबा हा मुक्त वाहे ...
कोकिळेचे सुर काळजाला छेडे .
एक मुक्त स्वप्न मला ही पडे ..
त्या स्वप्नात दिसे एक चिमुकला ..
साद घाले ह्या वेड्या आईला ...
लागे क्षणात मला त्याचा लळा ..
बोल बोबडे शब्द त्याचे ...
काळजात रुजे ...
वात्सलेल्या ह्या नवी पालवी फुटे ..
सांग ना सख्या ...
होईल का रे हे स्वप्न पुरे ..
नाही राहणार ना रे अधुरें ..
दुर्गा मते
खूप सुंदर 👌👌👌
ReplyDelete