आपण खूप प्रयत्न करतो . सुंदर दिसण्याचा पण अनेकदा त्या प्रयत्नांना अपयशच येतं . आणि मग आपण स्वतःला आरशात बघतो . आणि आपल्या सुंदर असलेल्या सौंदर्याला ही कुरूप समजतो . आणि ह्याचे साईड इफेक्ट म्हणजे आपल्या मनात न्यूनगंड निर्माण होतो . की आपण
सौंदर्याहिन आहोत. आणि हा न्यूनगंड आपल्या मनात नकारात्मक विचार स्प्रेड करतो .
33 कोटी यौनिनंतर लाभलेला हा मनुष्य देह आणि मनुष्य जन्म आपल्याला नकोसा वाटायला लागतो . का तर केवळ आपण दिसायला सुंदर नाही म्हणून ..पण खरं सांगायचं म्हटलं तर माणसाचं सौदर्य हे त्याच्या दिसण्यावरुन जज करूच नये . कारण त्याच्या शारीरिक
सौंदर्यावर त्यांची सुंदरता dipend नसते .
त्याची सुंदरता dipend असते ती त्याच्या विचारावर त्याचा संस्करावर त्याच्या टॅलेंटवर त्याच्या प्रामाणिक तेवर आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे मानवाची सुंदरता dipend असते ती त्याच्या स्वभावावर ..
व्यक्ती दिसायला किती सुंदर आहे . हे बघण्यापेक्षा तो मनाने आणि स्वभावाने कसा आहे. आचराने आणि विचाराने कसा आहे . हे बघण केव्हाही चांगलं .
कारण शारीरिक सुंदरता हि जस जस वय वाढेल . तस तशी ती लयास जाते . पण मनाची सुंदरता ही मात्र शेवटचा जो एक क्षण एक श्वास आपल्याकडे असतो . त्याही क्षणी ती सुंदरता आणि ते साैंदर्य आपल्याकडे शाबूत असतं .
लोकं आपल्याकडे आपण किती सुंदर दिसतो . हा पॉईंट लक्षात घेऊन काही क्षणासार्ठी आकर्षित होतात . तर त्याच्याच विरुद्ध आपले आचार विचार आणि स्वभाव लक्षात घेऊन लोकं आपल्याकडे आयुष्य भरासाठी आकर्षित होतात . आणि आपल्यावर भरभरून प्रेम ही करतात .
आपण जेव्हा सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो . तेव्हा खरं तर खूप मोठी चूक करत असतो . सुंदर दिसण्या पेक्षा सुंदर व्यक्ती महत्त्व आणि आपल्या प्रतिमेच सुंदर अस्तित्व बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे .
तेच जीवन जगण्यासाठी महत्वाचं आहे .
आता सुंदर असणं म्हणजे काय ? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर , सुंदर असणं म्हणजे आपल्या बोलण्याची पद्धत अशी असावी ..की समोरच्याला आपलं बोलण ऐकतच रहावं वाटलं पाहिजे . आपली एक smile बघून
समोरच्या मध्ये एनर्जी यायला हवी . आपला फेस समोरच्या व्यक्तीसाठी लकी फेस ठरायला पाहिजे . आपलं राहणीमान standred हवं . गाबाळ नको . आपला सहवास आपल्या सहवासात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवा हवासा वाटला पाहिजे . हे असतं सुंदर असणं . सुंदर दिसण्यासाठी स्टोअर मध्ये वेगळ्या वेगळ्या क्रीम सहज मिळतात . पण सुंदर असण्यासाठी मनाची किनार स्वश्च असायला हवी . आणि रक्तातच ती सुंदरता असायला हवी . म्हणजे एक सुंदर अस्तित्व आणि व्यक्ती महत्त्व व्हायला वेळ नाही लागणार .😊😊😊😊
आणि हे व्यक्ती महत्त्व च सुंदर दिसण्याच एकमेव सिक्रेट आहे .
आता तुम्हीच ठरवा तुम्हाला सुंदर दिसायचं की सुंदर व्हायचं आहे .😊😊😘😘🥰🥰🥰🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दुर्गा मते
Kgupach सुंदर लिहिलंय आहेस नित्या....👍👌✍️🍫🍫🍫🍫💞
ReplyDelete