नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 23, 2022

पुस्तक एक मित्र ..

 माणसाला माणसाचं आत्मदर्शन घडवत ..निती मूल्य तत्व ह्याची योग्य सांगड घालण्याची परिभाषा हे पुस्तक शिकवत .

कोणी आसपास असो नसो पण एक पुस्तक मात्र माणसाकडे  आवरजुन असावं . एकटेपणा पुस्तकाच्या सहवासाने नाहीसा होतो .

मानवाच्या आयुष्यात अन्न  , वस्त्र, निवारा ह्या गरजे प्रमाणे 4 थी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक आणि शिक्षण त्याच्या शिवाय मानव जातीचा विकास होणं शक्यच नाही .


पुस्तक जर जवळ असेल ना , तर ना मित्र आठवतो . ना मैत्रीण आठवते . डोळ्यांसमोर स्वप्नांची पहाट फुलते .


पुस्तकात कधीतरी आपलेही व्यक्ती महत्व झलकाव ..


हा विचार मनाला नकळत बिलगून जातो .


पुस्तकाच्या कोऱ्या पानात सजतात स्वप्न कोवळ्या मनाची .....


स्वप्नांना ही ओढ असते पूर्ण होण्याची ..


असतात ना ती ही , अपूर्ण राहिलेली कित्येक वर्षांची .


आणि कित्येक जणांची ..


आईची माया लेकीला स्वप्न दाखवते ...


बापाची कणखर सावली तिच्या स्वप्नांत जिद्द ओतते...


पुस्तकाच्या कोऱ्या पानातच आई वडिलांचे स्वप्न रुजते ..
लेकीच्या रूपाने जणू त्याला नव्याने पालवी फुटते ..

पुस्तकांचं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे . पुस्तकाच्या रुपात एक नवा मित्रच आपल्याला भेटतो . नुसतंच भेटत नाही तर , तो आपल्याला खूप काही शिकवत ही असतो . आपल्यात खूप सारे चांगले बदल ही त्याच्या अस्तित्वाने घडत असतात . त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पुस्तक नावाचा चांगला मित्र असावा . नुसतं मित्रच असू नये तर त्याच्याबद्दल ओढ ही असावी . त्याच्यावर जीवापाड प्रेम ही असावं . तरच आपल्याला पुस्तकाचं महत्व कळेल ..
आणि आयुष्य सुखकर होईल .
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...