नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 22, 2022

प्रणय ..

आजचा विषय खूपच छान आहे . अंध श्रद्धा आणि आपल्या लिखानातून अंधश्रधेला आला घालण्याचा काम माझ्या एवढं परफेक्ट कुठलाच लेखक करू शकत नाही .
कारण मी विषय खूप आगळा वेगळा निवडते . सहसा ज्या विषयावर कोणी बोलण्याची सुद्धा हिमंत करत नाही . अशाच विषयावर मला लिखाण करायला जास्त आवडतं .
जरा जास्तच कौतुक केलं का मी स्वतःच 😝😝पण काय करणार truth आहे . आणि शिवाय सर्व लीपिला मान्य आहे . असो हा झाला गंमतीचा विषय आता मी मेन मुद्द्यावर येते ..

माझ्या विषयाचं शिर्षक आहे .

" त्या filings चुकीच्या नसतात "

आता विषय पाहून प्रेम वैगरे ह्या विषयावर मी लिखाण करण्याचा विचार केला असेल असं तुम्हाला वाटतं असेल पण तो तुमचा गोड गैर समज आहे .

मी आज जरा outstanding विषयावर लिहिणार आहे . विषय खूपच नाजूक आहे . कृपया गैरसमज करून घेऊ नका .. माझ् लिखाण हे माझं फॅशन आहे . आणि माझे विचार हे माझं गॉड गिफ्ट आहे . आणि मी तेच गिफ्ट हळुवार पने सर्वांसमोर ओपन करत असते .

   प्रणय ह्यालाच दिलेली छान उपमा म्हणजे स्वर्ग सुख ..
प्रत्येकाला ते सुख अनुभवण्याची ईशा असते . शिवाय ते सुख अनुभवन प्रत्येकाचा अधिकार आहे . म्हणण्यापेक्षा ती फिजिकली गरज ही आहे . ती फिजिकली गरज फक्त नवरा बायकोच एकमेकांच्या पूर्ण करू शकतात अस नाही हे किंवा त्यांनीच त्या फिजिकल गरजा पूर्ण करायला हव्या . असा ही काही ठराव नाही हे .

लग्न झालेला पुरुष शरीराची भूक भागवण्यासाठी पर स्त्री कडे जातो . ह्यात काही गैर नाही . किंवा लग्न झालेली स्त्री दुसऱ्या पर पुरुषांकडे आकर्षित होते . ह्यात काहीही गैर नाही .

लग्न झालेला पुरुष किंवा स्त्री दुसऱ्या व्यक्ती कडे आकर्षित झाले म्हणजे . ते एकमेकांना धोका देतात . किंवा नवरा बायको तील प्रेम कमी झालेलं असतं . ह्या frod कल्पना आहेत . मला माहितेय माझे विचार तुम्हाला पटणार नाही . पण हा लेख अभ्यास करून लिहितेय . ह्यात फेका फेक नाही हे ,   मी अभ्यास पूर्व लिहितेय . मला अनुभव नाही हे पण filings मला ही कळतात कारण शेवटी मी पण एक माणूस आहे .

अनेकदा काय होतं स्त्री असो किंवा पुरुष ते एकमेकांना
वेळ देऊ शकत नाही . परिणामी ते एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही . एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या नाही तर त्याची चीड चीड होते . जीवन जगण्यात त्याला रस राहत नाही . मर मर राबा यचं आणि शारीरिक भूक मिटत नसेल तर कुडत बसायचं . स्त्री यांच्या ही बाबतीत सेम हेच होतं . 

आयुष्य जगायचं म्हणून जे जगत असतात ना , त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती आल्यानंतर अर्थात त्यांच्या आयुष्यात खूप बदल घडतात . ते naturally होतं . त्याला आपण चुकीचं नाही ठरवू शकत .

माणूस हा सुखासाठी जगत असतो . मग ते मानसिक असो किंवा शारीरिक माणूस हा सुखाच्या शोधात भटकत असतो . भटकता भटकता त्याला ते सुख कुठेतरी भेटतं आणि तो ते सुख पुरेपूर उपभोगतो तेव्हा तो वाईट नसतो.  फरक एवढाच असतो त्याचा त्याच्या मनावर ताबा नसतो .

शरीराची भूक मिटवण्यासाठी एक पुरुष पर स्त्री कडे जातो हे जर चुकीचं असतं . तर कुठल्याच परिस्तिथीत वेशा ह्या व्यवसायांची उत्क्रांती झालीच नसती .

कित्येक वर्षांपासून वेशा हा धंदा अस्तित्वात आहे . मान्य आहे तो गुन्हा आहे . पण तो गुन्हा करायला  कित्येक चांगल्या  घरातील माणस सज्ज असतात.  कारण फिजिकल प्रोब्लेम . मला तुम्हाला हे सांगायचं नाही हे की तुम्ही रोज तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेशा कडे जा मला ते आवडत नाही आणि मान्य ही नाही .

आणि माझा सांगण्याचा मुद्दा खूप वेगळा आणि तो मी खूपच थोडक्यात सांगणार आहे . कारण विषय वाढवला तर तो चर्चेचा विषय होऊ शकतो .

एखाद कुटुंब असेल त्या कुटुंबात  पती पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नसतील , तेव्हा पुरूषाने  किंवा स्त्रीने शारीरिक सुख किंवा मानसिक सुख बाहेर शोधल तर ते चुकीचे ठरत नसतात.  तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकले नाही . म्हणून ते त्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात .  ह्याचा अर्थ त्यांनी तुमचा विश्वास घात केला . त्यांचं तुमच्यावरच प्रेम कमी झालं . त्यांनी तुम्हाला धोका दिला असा होत नाही . तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करा.  ते  त्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडनार नाहीत .

जेव्हा ही ही घटना कुठल्याही फॅमिलीत घडते.  तेव्हा त्याचा बाऊ करू नये.  फिजिकली होतं ते ,  कळतं नकळत मनावरचा ताबा कधी सुटेल सांगता ही येत नाही.

जो मनापासून प्रेम करतो ना तो एकदाचं चुकतो वारंवार नाही . एवढंच लक्षात ठेवलं म्हणजे खूप झाल ..


😊😊


मला अजुन खूप लिहायचं होतं . पण स्टडी कमी पडला काय करणार लिहिलं असतं चांगल्या पद्धतीने लोकांनी लक्षात घेतले असतील वाईट हेतू . आणि ह्या सगळ्यात वाईट ठरले असते मी . पण मला खूप लिहायचं ह्या विषयावर पण असच नाही काल्पनिक थोडा अभ्यास करून लिहायचं .

दुर्गा मते .

काही चुकल असेल तर क्षमा करा .


2 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...