तुझ्या मनाचं दुःख मीच मांडते ..
पुन्हा एकदा प्रेमाने एक आर्त साद घालते ...
नको हळहळ व्यक्त करू मी सोडून जाते .
म्हणून नको उगी डोळे पाणाऊ ..
मला वाईट वाटते....
अर्ध्यावर सोडून चालले डाव प्रेमाचा ..
दारी सजला मंडप लग्नाचा ....
हा आगळा वेगळा खेळ रंगला नशिबाचा ..
जीव माझा तुझ्यात गुंतलेला ...
तू जणू जन्म माझ्यासाठीच घेतलेला ..
जीव तुझा माझ्यासाठी वेडावलेला ..
कळतेय दुःख तुझ्या मनाच ...
नाही रे त्या दुःखाला सावरायला पुरेस ..
आलिंगन ह्या शब्दाचं ..
तरीही करतेय प्रयत्न तुझ दुःख मांडण्याचा ..
प्रयास आहे माझा तुला थोड तरी सावरण्याचा ..
सोडून तुला जाताना तुझ्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्याचा
नको रे पाणाऊ डोळे तुझे ..
तुझ्यासाठी एकच स्वप्न माझे ..
जरी नाही होऊ शकले अर्धांगिनी ...
तरीही आयुष्यभरासाठी राहील ही प्रेयसी मैत्रीण म्हणून
कायमस्वरूपी ....
सावली बनुन साथीला तुझ्या नेहमीसाठी ...
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.