कँडल लाईट डिनर .
नभी सजला असेल मंडप चांदण्यांनी ..
काळोखात प्रकाश दाटला असेल ज्योतींनी ..
मंद मंद वारा सोबतीस स्वप्नांचा थवा ..
ह्या मनाचा त्या मनाला ठाव लागे नवा ..
भुरभुर उडणारे केस माझे , बोलके डोळे तुझे ..
आजानते नाते आपले सुर नवे शोधू पाहते ..
भेट पहिली अनोळखी दोंघाची ..
नयंनाची भाषा उमगली ..अनोळखी राहिली शब्दांची .
तू त्या किनाऱ्यावर मी ह्या किनाऱ्यावर ..
मी स्तब्ध राहिले तुझ्या अपूर्ण शब्दांवर ..
पहिल्या भेटीत तुला मी पाहतच राहिले ..
साथीला माझ्या कँडल लाईट डिनर ही सजले ..
जरी शब्द अपूर्ण राहिले , डोळ्यांनी मन मोकळे ..
आपले फर्स्ट कँडल लाईट डिनर सफल झाले ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.