नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 7, 2022

एकटीच चालली ..

 अंधाऱ्या वाटेवरून एकटीच मी चालते ..
प्रकाश किरण सोबतीला मागते ...
एकटीच मी चालते...

रात्र ती वैऱ्याची ....
निसटून गेली वीण हाडामासाची ..
सत्व परीक्षा होती ती माझ्या स्त्रित्वाची ..

आज ही मी ज्वालातून चालते ..
आगीतून  पुन्हा जन्म नवा घेते ..
एकटीच मी चालते ...

नियतीने सोडले वाऱ्यावर ..
घाव घातले माझ्या मनावर ..
शितोंडे उडविले चरित्रावर ....
नाही कुणी घातली फुंकर हळव्या वेदनेवर ..

गंध गेलेल्या फुलासम आयुष्य झाले ..
माझीच माणसे मला अनोळखी झाले ..

नात्याची वीण ही निसटून गेली ..
मी ह्या वाटेवरून एकटीच चालली ..
चालतांना प्रकाशाची भीक मागितली ..
दुर्गा मते .

कविता पूर्णतः काल्पनिक आहे माझ्या वैयक्तिक आयुष्याशी संबधित नाही ..ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ..

1 comment:

  1. छानच 👌
    🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...