नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 6, 2022

गोष्ट एका राजा राणीची ..

 राजाला  त्याच्या राणीसाठी वेळच  नसतो ......


दिवसभर बिझी असतो ..रात्र झाली की थकतो ..

राणीसाठी वेळ काढण्याचा खूप प्रयत्न करतो ..
तरीही वेळ देण्यास असमर्थ ठरतो ..

राणी बिचारी वाट पाहून पाहून थकते ..
सजलेल्या सांजेला ही मग दृष्ट लागते ...

सांज ही हळुवार लयास जाते ..
राजाच्या प्रतीक्षेत मग राणी झोपून जाते ..

राजा बिचारा धमून थकून येतो ..
आपल्या प्रतीक्षेत झोपी गेलेल्या राणीला पाहून नाराज होतो ..

तिच्या चेहऱ्यावर पसरेल तेज तिचं त्याच्यावर असलेल्या
प्रेमाचं प्रतीक भासतं ....
राजाला ते त्याच्या जिवापेक्षा प्यार असतं ..

राजा हळुवार तिच्या जवळ जातो .
तिच्या कपाळावर नाजूक किस करतो ..

त्याच्या प्रेमळ स्पर्शाने ती ही मोहरते ..
स्पर्श होता त्याचा त्याला मिठीचे आलिंगन देते ..

दिवसभर वाट बघून थकलेल्या जीवाची तृष्णा मिठते ..
राजा राणीची एकमेकांना समजून घेण्याची पद्धत मला खूपच आवडते...
दुर्गा मते

2 comments:

  1. खूपच छान 👌
    भावना हृदयस्पर्शी 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...