नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 25, 2022

संघर्षावर मात करायची ...

नात्यांची घडी जेव्हा विसकटते - खूप प्रयत्न करूनही अपयश पदरी पडते .  तेव्हा सुरू होतो मनाचा संघर्ष .....

किरकोळ गैर समजामुळे जेव्हा आपल्यावर बोटं दाखवलं जातं . आपलीच माणसं आपल्याला नको  नको ते  बोल लावतात . तेव्हा सुरू होतो खरा मानसिक त्रास आणि मनाचा संघर्ष ...त्या संघर्षावर जो मात करतो . तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो .

वाद - विवाद करून काहीही साध्य होतं नसतं , शांततेचा


मार्ग अवलंबून शांत राहणच योग्य असतं . हे फक्त ज्ञानी  आणि सयंमी   माणसाला कळतं . 


संघर्ष काळाची गरज आहे . माणसाला समोर येणाऱ्या संकटावर मात करण्याची जिद्द आणि ज्ञान हा संघर्ष चं देत असतो.  त्यामुळे  आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे . आणि वेळोवेळी खूप संकट येतात म्हणून हतबल व्हायचं नसतं . तर  येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला नेटाने तोंड द्यायचं असतं . आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं .


मानसिक त्रास झाल्यानंतर जो संघर्ष आपण करत असतो .तो खूपच मोठा असतो . अगदी जीवघेणा असतो . कारण त्या वेळेस आपल्याला आधार देणारेच कधी कधी बोल लावत असतात . त्यामुळे आपण अजूनच खचून जातो . पण तेव्हाही धीराने प्रत्येक परिस्थितीवर मात करायची.  आणि आपल्याला आपल्या माणसांशी गरज असताना कोण आपल्याशी कसं वागतो . हे फक्त लक्षात ठेवायचं . कधी बोलून नाही दाखवायचं . आणि सरळ मार्गाने पुढे चालायचं . आणि आपलं आयुष्य हे आनंदाने जगायचं .

दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...