बंद डोळ्यांच्या कडानी अजुनही पाहते तुला ,
सभोवताली असूनही दूरवर शोधते तुला ..
विसरूनही पुन्हा आठवते तुला ...
साद पोहचणार नाही तुजपाशी माहीत असूनही ..
साद घालते तुला ....
हरवतांना माझ्यात मी , शोधते तुला ..
एकाकी आयुष्य जगताना मागते तुला ..
साथ जन्मोजन्मीची ...
सख्या बघुया आपण स्वप्न सुखी संसाराची ....
जन्मोजन्मीची साथ तुझी हवी मला ..
सांगते आज तुला .....
सांग सख्या ..देशील ना रे साथ मला ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.