सुख दुःखात देईल तुझी साथ ..
तुझ्या हातात दिलायं ना हात
नाही घेणार कधी माघार ..
करेन तुझ हर एक स्वप्न साकार ..
होईल आपला संसार सुखाचा ...
असू दे मला आधार तुझ्या सहवासाचा ..
अर्धांगिनी होण्याआधी तुझी मैत्रीण होईल ...
प्रेयसी होऊन प्रेमाची कबुली मी देईल ..
सप्तपदी चाललेलं प्रत्येक वचन मी निभवेन ...
शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीचं जगेन ...
पुन्हा एकदा सांगते आत्मविश्वासाने ..
होईल आपला संसार सुखाचा ..
असू दे मला आधार तुझ्या सहवासाचा ..
दुर्गा मते...
No comments:
Post a Comment
Comments plz.