नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 26, 2022

ठरलयं माझ , नाही परतायचं पुन्हा तुझ्या गावाला ..

का रे असं करतो ...
पुन्हा पुन्हा तुझ्यात गुंतवितो ...
पुन्हा पुन्हा स्वप्नात येतो ..
आभासी तुझ्या प्रेमात मला फसवतो ..

ठरलयं माझ ,
नाही परतायचं पुन्हा तुझ्या गावाला ..
नव्याने विरहाच्या असंख्य वेदना नाही ,
द्यायच्या माझ्या मनाला ....

सुटलेत आता हात ...
मनावर झालेत वार ..
नको आता पुन्हा एक होण्याचा नाद ..
हवा हवासां  वाटतो , मला तुझा माझा संपलेला संवाद ..

नको शोधू  आता एक होण्याचे बहाणे ..
नको ऐकुस पुन्हा नव्याने जीवन गाणे ..
तुझ्या माझ्या प्रेमाचे पुराणे ..
करू दे ना , मला संसार सुखाने ..

ठरलयं माझ ,
नाही परतायचं पुन्हा तुझ्या गावाला ..
नव्याने विरहाच्या असंख्य वेदना नाही ,
द्यायच्या माझ्या मनाला ....


दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...