खरच किती स्वार्थी झाले मी ..
किती सहज तुला विसरले ..
सहज विसरले नातं प्रेमाचे पवित्र ते ..
राधा कृष्णच नाव ऐकल की पहिला
तू आठवतोस ...
मग हुंदका उरी दाटतो ..
भावनांचा अनोखा सोहळा मनात रंगतो ..
तुझ्या आठवणीत जीव व्याकुळ होतो ..
तुझ्याशी बोलण्यासाठी तळमळते ..
आजही बंद खोलीत तुझ्यासाठीच विव्हळते ..
माझ्या आधी तुझा विचार करते .
खरचं तू हॅपी आहेस ना ? तुझ्या आयुष्यात स्वतःला च विचारते ..
आणि तू नाराज असल्याची चाहूल लागताच पुन्हा रडते .
कारण मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.