नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 15, 2022

जेव्हा मी लिहायला लागली ..

लिहायला सुरुवात केली ...
आयुष्यातील दुःख सरली ..
स्वतःचीच एक ओळख निर्माण झाली ..

भेट झाली माझी ..
माझ्यातीलचं कवयित्रीशी ..
आयडीया आली.
स्वतःशी संवाद साधन्याची ..

खळखळून हसायला शिकले ..
मनभरून रडायला शिकले ..
स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यास सज्ज झाले ..

प्रेमाची परिभाषा कशी कळली ...
माझी मलाच नाही समजली ..
माझी प्रीत कधी बहरली ..

प्रीतीनेच त्या  विरहाची वाट कशी पत्करली ..
आज ही  नाही समजली ...
प्रेमाची परिभाषा कशी उमगली ..

स्वतःशीच एक ओळख निर्माण झाली ..
जेव्हा मी कवयित्री म्हणून लिहायला लागली ..
अनुभवांची शिदोरी सोबतीला आली ..
माझ्यातील कवयित्री खऱ्या अर्थाने कवयित्री झाली .
दुर्गा मते


2 comments:

  1. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. छानच लेख... !
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...