नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 14, 2022

साजरा होऊ दे सोहळा ..

एक सुरेल गाने गाऊया आपण जोडीने ..
बाग संसाराची फुलवूया प्रेमाने ..

सांजेला त्या गुपित सांगुया .....
मिलनाची रात ही डोळ्यात साठवूया ..

पारखून घेऊ एकमेकांस नव्याने ...
 हळव्या ह्या भावनेला अनुभवूया उघड्या डोळ्याने ..

केसांच्या रचनेत माझ्या ..
तू ही शोध छटा तुझ्या ..

पावलांनी माझ्या मागितले पैंजण राजा ..
साजरा करण्यास ह्या मिलनाचा सोहळा ..

गजरा माझा आसुसला तुझ्या स्पर्शासाठी . 
रात्र ही थांबली तुझ्या माझ्या मिलनासाठी ..

गंध तू घे ह्या कोवळ्या मनाचा ...
कर साजरा हा सोहळा मिलनाचा ..

दुर्गा मते

1 comment:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...