एकाने तानल की दुसऱ्याने सावरायचं असतं .
एकाने समजून सांगायचं असतं तर ,
दुसऱ्याने समजून घ्यायचं असतं ..
एक कठोर झाला , तर दुसऱ्याने मृदू व्हायचं असतं .
संसाराच रहाटगाड असच चालवायचं असतं .
एकाने अपेक्षा ठेवल्या तर , दुसऱ्याने त्या पूर्ण करायच्या असतात ...
एकाची स्वप्न मृत पावली तर , दुसऱ्याने त्याचं स्वप्नांना जन्म द्यायचा असतो .
एकाने रागवायच असतं तर , दुसऱ्याचे मनवायच असतं .संसाराच रहाटगाड असच चालवायचं असतं ..स्वतःसाठी नाही एकमेकांसाठी जगायचं असतं .तडजोडीच आयुष्य स्वीकारायचं असतं .
एकमेकांना समजून घेण्यात सुख मानायच असतं .
संसाराच रहाटगाड असच चालवायचं असतं .
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.