नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 12, 2022

फिजिकल प्रोब्लेम लक्षात घेणं ही गरजेचं असतं .

Hi friends 🙋🙋

आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे . मला खात्री आहे . ती तुम्हाला आवडलेच आणि नाही आवडली तरी हरकत नाही . 🤪🤪
पण तरीही वाचा तुम्ही कारण मला खात्री आहे तुम्हाला आवडेलच ..

      ही स्टोरी नैना आणि धीरजची ...

नैना एक छोटस फॅशन इन्स्टिट्यूट चालवणारी मुलगी . आई लहान असतानाच देवाघरी गेले . वडील अपंग  पदरात दोन लहान भावंड...घराची सारी जबाबदारी नकळत्या वयात नैनावर येऊन पडली . आणि तिने ही त्या काळी स्विकारलेली जबाबदारी ती आज ही नेटाने पेलत होती .

  तर धीरज पाटील घराण्यातील एकुलता एक मुलगा लाडाकोडात वाढलेला . श्रीमंत बापाचा श्रीमंत मुलगा आपल्या श्रीमंतीचा त्याला जराही गर्व नव्हता . स्त्रियांची तो खूप आदर करायचा . आणि ह्याच ही खूप मोठं हेल्थ क्लब होतं . अगदी नैना च्याच इन्स्टिट्यूट समोर .
त्यामुळे त्यांची सतत गाठ भेट व्हायची .

नैना दिसायला तर सुंदर होतीच पण मनाने आणि स्वभावाने ही खूप सुंदर होती . तिच्यासाठी आपलं परक अस काही नव्हत . ती सर्वांना आपलच मानायची .
आणि तिच्या ह्या दिलदार स्वभावावर च तो खूप भाळला .

प्रेम फिलॉसॉफी हे त्यांच्या तत्वात ही नव्हत . पण नैनाच्या येण्याने त्याची सर्व तत्व मोडीत निघाली . तो तिच्या प्रेमात पडला आणि कधी नव्हे ते कोणाच तरी आयुष्य बरबाद करण्याचं कारण ठरला . त्याने जाणून बुजून नव्हत केलं अस . कळत नकळत घडलं होतं . फिजिकल atraction मुळे .

बघुया काय घडलं होतं त्याच्या आणि तिच्या आयुष्यात ते थोडक्यात .....

    नातं तसं त्यांचं मैत्रीचं  होतं . नावाला मैत्रीचं होतं . तस मैत्री पेक्षाही खास होतं . ती त्याच्यावर एक मित्र म्हणून खूप प्रेम करायची.  आणि तो ही तिच्यावर एक मैत्रीण म्हणून खूप प्रेम करायचा . Bf - gf ला ही लाजवेल अशी त्यांची प्रेम कहाणी होती . निस्वार्थ प्रेमाची निस्वार्थ कहाणी ...

त्यांच्या जरी खूप छान नातं असलं एकमेकांवर खूप विश्वास असला तरी ही नैनाला धीरजची एक गोष्ट खूप खटकायची . ती म्हणजे तो कधी कधी एवढं छान वागायचा की कोणीही म्हणेल तो नैनाच्या प्रेमात आहे . आणि कधी कधी असं वागायचा नैनाला ही त्याच्या तस वागण्याचा खूप राग यायचा . तो डायरेक्ट तिला अनोळखी समजून तिला ओळख न दाखवता इग्नोर करायचा ..


तेव्हा ती आतून खूप दुखावली जायची . कारण ती ठरवून ही त्याच्याशी तशी वागू शकत नव्हती . ती नेहमीच त्याच्याशी प्रेमाने वागायची . अनेकदा तिने त्याला त्याच्या तसं वागण्याचं कारण विचारल . पण त्याने तेव्हा सर्व काही हसण्यावर नेलं . आणि उत्तर द्यायला टाळाटाळ केली .

पण एक दिवस ती हट्टालाच पेटली तेव्हा त्याने थोडक्यात त्याची लव्ह स्टोरी तिला सांगितली . तिला ही  खूप वाईट वाटलं त्याची लव्ह स्टोरी ऐकुन ती ही हळवी झाली . आणि त्याच तस  वागणं स्वाभाविक आहे . असा समज करून शांत झाली . पुन्हा तिने त्यांचं तिला अचानक इग्नोर करण मनावर घेतल नाही . तर त्या परिस्थितीत तिने त्याला नेहमीच समजून घेतलं . एक छान मैत्रीण म्हणून आलिंगन दिलं . आणि तिच्या त्या निरागस बाबड्या मनाच्या एका कोपऱ्यावर अलगद धीरज च नावं लिहिलं गेलं  .


ती त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करू लागली . कुठल्याही अपेक्षाशिवाय तो ही तिच्यावर प्रेम करायचा . अगदी निस्वार्थच ...पण एक दीड महिन्यात एकदा तरी त्याला अटॅक यायचा . तो अटॅक एका आजाराचं स्वरूप आहे . असं म्हटल तरी हरकत नव्हती . आणि त्या अटॅकचा तिला खूप राग यायचा . तो अटॅक त्याचं रूप एक दीड महिना दाखवायचा . एक दीड महिना त्यांच्यात खूप अंतर पडायचं . आणि ते अंतर तिला नकोस वाटायचं .

नको रे दुरावा हा असा नात्यात ..
नाही जातं रे क्षण आनंदात ..
जेव्हा तू असतोस सहवासात ..
तेव्हा दुःखच नाही राहत रे आयुष्यात ..
तूच आहेस माझ्या सुखाची किनार ..
कधी रे तुला कळणार ..
तुझे असे वाऱ्यासारखे वागणे कधी रे बदलणार ..

ती त्याच्या आठवणीत रात्र रात्र जागायची . ओक्साबोक्सी रडायची आणि जेव्हा तो त्या अटॅक मधून बाहेर यायचा . तेव्हा ती त्याला एक घट्ट मिठी मारायची.  आणि एक दीड महिन्याचा विरह विसरण्याचा प्रयत्न करायची .

ह्या वेळेस ही असच झालं . तो अटॅक मधून बाहेर आला आणि तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करू लागला . त्याला मध्येचं भलते सलते अटॅक येतात ये ही तो विसरला आणि तिला ही वाटलं की त्याला तसे अटॅक येणं बंद झालं . कारण एक वर्ष होतं आलं होतं . त्याने नैनाला इग्नोर केलं नव्हत . बहुतेक नैना च्या भेटीत धीरज धीरज चा past विसरला होता . त्याने एका नवीन आयुष्याची सुरुवात केली होती . ती ही त्याच्यावर वेड्या सारखं प्रेम करू लागली होती .

तुझ्या भेटीत सारचं मिळाला ..
आकाश चांदण्यांनी सजल ..
तुझ्यात माझं मन रमलं ...
आयुष्य अर्धवट राहता राहता पूर्ण झालं ..
तुझ्या भेटीत सारचं मिळालं ...

ती आणि तो खूप खुश होता . चोवीस वर्षांनंतर तो आज पहिल्यांदाच नैना बरोबर त्याचा birthday selibreat करण्यासाठी तयार झाला होता . केवळ नैनाला आवडत म्हणून तो birthday selibreat करणार होता .

सर्व प्लॅनिंग तिनेच केलं होतं . फक्त तो तिला फॉलो करत होता.  आज तो पूर्णपणे तिला समर्पित झाला होता.  तिच्या मनासारखं वागत होता .

सर्व काही सुरळीत चाललं होतं . आजचा दिवस दोघांसाठी ही खास होता . कारण आज ते दोघेच होते फक्त एकमेकांसाठी एकमेकांच्या आयुष्यात ...

    फॉर्म हाऊस वर तिने त्याच्या birthday ची प्लॅनिंग केली होती .

पूर्ण फॉर्म हाऊस काळोखात कँडलने सजलेला . नैना ने ही नेव्ही ब्लु कलरची साडी घातली वन साईड पदर घेतलेला  आणि केस मोकळे  ती त्या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होती न कुठल्याही  पुरुषाला त्या क्षणी कोणत्याच filings control होऊ शकल्या नसत्या . आणि धीरजच्या ही बाबतीत नेमकं तेच घडलं .

         त्या क्षणी त्याच्या फिजिकल गरजा वाढल्या . आणि तो तिच्याकडे attract झाला . दोघांच्याही मनाचे ताबे सुटले आणि त्या रात्री नको ती घटना त्यांच्या आयुष्यात घडली ...


आणि आजची संध्याकाळ तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक  . तो जरी तिच्या ओळखीचा होता . तरी आज तो तिला अनोळखी वाटतं होता . त्याच्या स्पर्शात प्रेम .. ममता ..वात्सल्य नव्हत . होती ती फक्त एक अनामिक ओढ .  त्याच्यात दडलेली राक्षसी वृत्तीशी  तिची आज ओळख झाली होती . आणि ती ओळख तिला फार महागात पडली ...


तिने त्याला खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला . पण तिची क्षमता कमीच पडली . आणि तिचं  चारित्र्य पणाला


लागले .


तिने त्याला जाब ही विचारला तू का केलंस अस ? तेव्हा तिच्या ह्या प्रश्नावर त्याने प्रतिऊत्तर   दिले ...


" हे बघ नैना ..मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती . ती आजपर्यंत लपवून ठेवलेली आहे . हे बघ मला ते अटॅक वैगरे काहीही येतं नव्हत . तो एक ड्रामा होता .


तुझा विश्वास जिंकण्यासाठी . मी वाईट आहे अस नाही . कुठल्याही मुलीला पाहिलं की माझ्या मनात तिच्या विषयी एक अनामिक ओढ दाटून येते   . मुलींविषयी मला फिजिकल attraction जास्त आहे . म्हणून मी कुठल्याच मुलीशी कनेक्ट होत नाही . आणि झालो तरी तिच्यात इंव्होल होतं नाही  . कारण त्याचे फार वाईट परिणाम त्या बिचारीला भोगावे लागतात . फिजिकल अँड मेडिकल प्रोब्लेम आहे .  मी काहीही मुद्दाम हून करत नाही . कळत नकळत घडत ग माझ्या हातुन .." आणि तो खाली बसून चेहऱ्यावर हात ठेवून ओक्साबोक्सी रडु लागतो . त्याच्या वागण्याचा त्याला खूप पश्चाताप होतो. 


तिला ह्या क्षणी त्याचा राग नाही तर , त्याची कीव येत होती .


" रडू नकोस धीरज काही हरकत नाही.  माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे . तू त्या प्रेमाचा स्वीकार कर . मला वाळीत नको टाकू मला नव्हतं रे माहीत तुझ्या ह्या प्रोब्लेम बद्दल मी कधीच तुझ्यात इंव्होल नसते झाले . पण आता एक कर माझ्याशी ह्या क्षणी लग्न कर .."


ती त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याला विनंती करते .  तो ही तिच्या त्या प्रेमाचा स्वीकार करतो .


आणि तिच्याशी लग्न करायला तयार होतो .


चूक केली म्हणजे आपण चुकीचे ठरत नसतो . ती चूक योग्य रित्या सुधारता आली पाहिजे.  जर ती चूक न सुधारता आपण वारंवार तिचं चूक पुन्हा पुन्हा करत राहिलो तर आपण चुकीचे ठरत असतो . आणि कधी कधी फिजिकल प्रोब्लेम ही लक्षात घ्यावा माणसाने . समोरच्याचा राग नाही येत . कीव येते . जर फिजिकल प्रोब्लेम खरोखर अस्तित्वात असेल तर ..समोरच्याची मनस्थिती लक्षांत घेणं आणि त्याला समजून घेणं सर्वात महत्वाचं असतं .

ही कथा माझ्या कल्पना विश्वातील आहे . ह्याचा वास्तवाशी काहीही  संबंध नाही . आणि काही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .
ह्यात मांडले ला फिजिकल प्रोब्लेम ही मी कल्पनेतून मांडलेला आहे ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...