कोण म्हणतं पुरुषाला वेदना नसते .
पुरुषाला ही असते की वो वेदना ..
विरहात तो ही रडतो ..
प्रेयसीसाठी लिहिलेले प्रेम पत्र ..
त्याच्याच आसवांत भिजवतो.
त्याला ही हव् असतं कोणीतरी हक्काचं ..
भरभरून प्रेम करणार कोणीतरी जिवाभावाच ..
त्याला ही हवा असतो मुक्त संवाद ..
नको असतात वाद विवाद ..
त्याची ही अपेक्षा असते ..
कोणीतरी आपल्याला समजून घेण्याची ..
त्यालाही गरज असते एका प्रेमळ मैत्रीनीची .
गरज काळाची पुरुषी वेदना समजून घेण्याची ..
कोण म्हणत पुरुषाला वेदना नसते ..
त्याला खळखळून रडण्यासाठी ..
आणि मन मोकळं करण्यासाठी हक्काचं ठिकाणचं नसत .आणि हीच प्रत्येक पुरुषाची सर्वात मोठी वेदना असते .
दुर्गा मते
खूपच छान 👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
एकदम बेस्ट पिल्लू....🍧🍫🍫✍️✍️✍️✍️👍👍👌
ReplyDelete