प्रेम की मैत्री ह्यात नेहमी द्वंद असते ..
पण मी सांगते ...
प्रेमापेक्षा नेहमीच मैत्री श्रेष्ठ असते .....
प्रेम आलं की अधिकार येतो . शिवाय असलेली मैत्री ही गमवण्याची भीती असते . त्यापेक्षा केवळ निखळ मैत्री काय वाईट आहे . अगदी शेवटपर्यंत निखळ मैत्री जपण्याची वचन देणं ह्यात काय गैर आहे.
प्रेम करून ते प्रेम अर्ध्यावर सोडून जाण्याला समोरच्याच आयुष्य बरबाद करण्याचा काय अधिकार आहे आपल्याला ...
त्यापेक्षा मैत्रीचं किती श्रेष्ठ आहे . ना आपण कोणाचेही आयुष्य बरबाद करण्याचं कारण ठरतो . ना आपण कोणाच्या भावना दुखावतो . ना आपण कोणालाही अर्ध्यावर सोडून जातो. कुठलीच पोकळी मनात घर करुन राहत नाही . कीवा मनाला जखम करत नाही . आपण कोणाचं तरी आयुष्य बरबाद केलं ह्याचा कलंक ही माथी लागतं नाही .
नातं नवरा बायकोचं असो . किंवा प्रियकर प्रेयसी चं त्यामध्ये मैत्रीच्या व्याख्या वापरन नेहमीच योग्य असतं .
नवरा बायको म्हंटल तर पुरुष हा पुरुषार्थ गाजवतो . त्यापेक्षा नवरा एक मित्र म्हणून आपल्याशी कनेक्ट झाला तर काय फरक पडेल . उलट आपलं नात अजुनही strong आणि परफेक्ट असेल.
नातं कोणतेही असो . मैत्रीची परिभाषा त्या नात्याला देणं किंवा जोडण महत्वाचं असतं. कारण ह्या जगातील सर्वात सुंदर नातं जर कोणतं असेल तर फक्त मैत्रीच आहे . त्यामुळे प्रत्येक नात्यात फ्रीडम आणि फ्रेंडशिप ला सर्वात जास्त महत्त्व असावं अस मला मनापासून वाटतं .
दुर्गा मते
खूप छान लेख लिहिला नित्या 👌👌👍
ReplyDelete